Tuesday, September 26, 2023

किरण मानेंनी शाहरुख खानसाठी शेअर केलेली पोस्ट व्हायरल; म्हणाले, ‘भावा तुझा स्पर्श…’

मराठी सिमेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते म्हणजे किरण माने होय. किरण माने यांनी त्यांच्या अभिमयाच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. ते पहिल्यांदा बिग बाॅसमध्ये दिलले होते. त्यानंतर ते प्रसिद्धीच्या झोतात आले. ‘मुलगी झाली हो’ ही त्यांची मराठी मालिका खूप गाजली. त्या मालिके दरम्यान किरण माने आणि काही कलाकारांचे वाद झाले होते. त्यामुळे ते चर्चेत आले होते. किरण माने सोशल मीडियावर सतत सक्रिय असता. ते त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करतात. तसेच अनेक विषयांवर मत सोशल मीडियावर मांडत असतात. त्यामुळे ते चर्चेत येत असतात. सध्या किरण माने यांनी शाहरूख खानच्या (ShahRukh Khan)  जवान चित्रपटाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

किरण माने यांनी पोस्ट करताना लिहिले की, ” आग्गाग्गा… एक लाखाच्या वर लाईक्स… पाचशेच्या वर कमेन्टस्… दोन हजाराच्या वर शेअर्स… आणि तब्बल एक मिलीयन, म्हणजे दहा लाखाच्यावर व्हियूज. अजूनबी सुरुच आहे. ते ही माझ्या फेसबुक पोस्टवर, इन्स्टा-युट्यूबवर नव्ह. नादखुळाच…आजपर्यंत माझ्या कुठल्याही पोस्टचे लाईक्स मी मोजले नाहीत. हो, पण कोण लाईक करतंय आणि कमेंट काय येताहेत हे मात्र आवर्जुन पहातो, यातून समविचारी लोक कळतात, जवळ येतात. विषारी घाण दूर जाते.

नको असलेला कचरा बाहेर जाऊन महाराष्ट्रभरात माझा मित्रमेळा पसरला तो यामुळेच… चाहते, प्रेम करणारी माणसं माझ्याशी संवाद साधू लागली. आयुष्य बहरून गेलं. काही जणांच्या दृष्टीनं हे ‘आभासी जग’ असो, मला मात्र यातून जिवंत, रसरशीत, हाडामासांचा, जीवाला जीव देणारा गोतावळा लाभला. माझ्यावर वाईट वेळ आली होती, तेव्हा अख्ख्या सोशल मिडीयानं आवाज उठवून भल्याभल्यांची हवा टाईट केलीवती, ती उगाच नाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

 कालपासून मात्र माझ्या फेसबुक अकाऊंटवर छप्परतोड, आजपर्यंतचे रेकाॅर्डब्रेक कहर झालाय. मी ‘जवान’च्या स्क्रीनिंगच्या वेळचा एक व्हिडीओ शेअर केला, त्याला फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे, देशभरातून नव्हे, आशियातून नव्हे, तर जगभरातून प्रचंड रिस्पाॅन्स मिळाला. श्रीलंका, बांग्लादेश, इंडोनेशिया, मलेशिया, पाकिस्तान, नेपाळ, साऊथ कोरीया, दुबई, म्यानमार, सौदी अरेबीया, इंग्लंड, अमेरीका, बल्गेरीया वगैरे वगैरे देशांमधले लोक माझ्या पोस्टवर आले. वर आकडे दिलेले आहेत. ते वाढतच चाल्लेत, ‘जवान’च्या करीश्म्यासारखे.

शारख्या, भावा तुझा स्पर्श ह्यो परीसाचा स्पर्श हाय… साध्या गोष्टीचबी सोनं करतोस तू… ‘सिनेमा इंडीया’ जगभरात लखलखतोय, झळाळतोय तुझ्या मिडास टच मुळं ! रूंब रूंब रूंब नांद्री… आणि लब्यू लैच ” अशी पोस्ट किरण माने यांनी लिहिली आहे. तसेच हार्ट इमोजी देखील शेअर केले आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहते लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत आहे. (A post shared by Kiran Mane for ShahRukh Khan went viral)

अधिक वाचा-
‘तू तर मराठीतला शाहरुख खान’, पाहा चाहत्याच्या कमेंटवर काय म्हणाला गष्मीर महाजनी
‘सुभेदार’ चित्रपट पाहतच समीर वानखेडे यांनी केली पोस्ट शेअर; म्हणाले, ‘प्रत्येक भारतीयांचे…’

हे देखील वाचा