Wednesday, July 3, 2024

विराट आणि जडेजाचा भन्नाट डान्स पाहून बॉलिवूड किंग म्हणाला…,

बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा ‘पठाण’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. पठाण चित्रपट असो की, चित्रपटातील गाणी बरीच प्रसिद्ध झाली आहेत. दररोज कोणी ना कोणी या गाण्यावर नाचतांनाचे व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असतात. या चित्रपटातील गाण्याचा मोह भारतीय क्रिकेटपटूंना देखील आवरता आला नाही. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये क्रिकेटपटू विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांचा गाण्यावर नाचताना व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावर किंग खाननेही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.

शाहरुख आणि दीपिका (Deepika Padukone) यांचा ‘पठाण’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दोघे पठाणच्या (Pathan) ‘झूम जो पठाण’ गाण्यावर नाचत आहेत. हा व्हिडिओ बघुन शाहरुख खानने (shahrukh khan news) खास प्रतिक्रिया दिली आहे.

प्रत्येकजण ‘पठाण’ किंवा ‘बेशरम रंग’ या गाण्यावर नाचताना दिसतो. काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) फेम ‘अर्चना गौतम’ आणि ‘प्रियांका चाहर चौधरी’ (Priyanka Chahar Chaudhary) यांनी चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यावर डान्स केला होता. तसेच भारतीय खेळाडू ‘विराट कोहली’ (virat kohli) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) हे दोघेही पठाणच्या गाण्यावर थिरकले आहेत.

खरं तर, शाहरुख खान सध्या ट्विटरवर खूप सक्रिय आहे. ‘आस्क एसआरके’ या सत्रामध्ये चाहते अभिनेत्याला मनातले प्रश्न विचारतात. त्यावेळी किंग खानही चाहत्यांच्या सर्व प्रश्नांची बेधडक उत्तरं देतो. एका चाहत्याने गाण्याच्या व्हायरल व्हिडिओचा उल्लेख केला तेव्हा, त्यावर प्रतिक्रिया देताना शाहरुख म्हणाला, “या दोघांनी माझ्यापेक्षा चांगला डान्स केला आहे. मला त्या दोघांकडून शिकावे लागेल.” हे ट्विट इंटरनेटवर जोरादार व्हायरल होत आहे.

शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 475 कोटींचा आकडा पार केला आहे. त्याच्या चित्रपटाची जबरदस्त कमाई पाहता या आठवड्यात 500 कोटींचे कलेक्शन होईल, असा अंदाज लावला जाऊ शकतो. ‘पठाण’चे भारतात हिंदी, तमिळ आणि तेलगू या तीन भाषांमध्ये एकूण 493.25 कोटी रुपयांचे कलेक्शन आहे. या चित्रपटाने जगभरात 900 कोटींहून अधिक कमाई केली आहे. (shahrukh-khan-reacts-on-virat-kohli-and-jadeja-viral-video-dance-pathan-movie-songs)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
बिग बॉस १६ नंतर झालेल्या पार्टीमध्ये सलमान खानने केली शिव ठाकरेशी चर्चा, वाचा काय म्हणाला दबंग खान
आता विवेक अग्निहोत्री बनले शारूखचे फॅन, ‘पठाण’चे यश पाहून ‘किंग’वर उधळली स्तुतीसुमने

हे देखील वाचा