Thursday, March 28, 2024

आस्क एसआरके सेशनमध्ये शाहरुख खानने का सांगितले, ‘खूप पेनकिलर खाव्या लागतात’

शाहरुख खान सध्या त्याच्या ‘पठाण’ सिनेमाला मिळालेले यश एन्जॉय करत आहे. पठाण ला प्रेक्षकांनी दणदणीत प्रतिसाद दिला असून, सिनेमाने बक्कळ कमाई केली आहे. सिनेमाने जवळपास ४०० कोटींचा गल्ला जमवला असून, सध्या सिनेमाची टीम आणि शाहरुख खान सर्वच तुफान खुश आहेत. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान कुठे कलाकार दिसले नाही मात्र चित्रपटाला घवघवीत यश मिळाल्यानंतर शाहरुख आणि इतर कलाकार मीडियासमोर आले आणि दिलखुलास गप्पा मारत सर्वांच्या प्रश्नांना उत्तरे देखील दिली.

यातच आता पुन्हा शाहरुखने ट्विटरवर आस्क एसआरके असे एक सेशन घेतले आणि त्यात त्याच्या चाहत्यांनी त्याला अनेक प्रश्न विचारले. आस्क एसआरके या सेशनमध्ये अनेकांनी त्याला विविध प्रश्न विचारले तर काहींनी त्याला अनेक सल्ले दिले. फॅन्सच्या प्रश्नांवर शाहरुखने देखील अनेक मजेशीर उत्तरे दिली. एकाने त्याला सांगितले की, ‘तुम्ही आता ‘डंकी’नंतर जास्त ऍक्शन सिनेमेच साईन करा.’ यावर त्याला मजेशीर उत्तर देताना शाहरुखने म्हटले ‘हो यार पण खूप पेन किलर खाव्या लागतात.’

तत्पूर्वी शाहरुखने त्याच्या ‘पठाण’ सिनेमात रॉ एजेंटची भूमिका साकारली असून, जॉन अब्राहम यात नकारात्मक भूमिकेत आहे. दोघांच्या दमदार ऍक्शन आणि स्टंट्स लोकांना खूप आवडता आहे. शिवाय सिनेमातील सलमान खानचा कॅमिओ रोल देखील सिनेमात मोठा ट्विस्ट आणणारा आहे. याशिवाय आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया यांच्या भूमिका देखील गाजत आहे.

‘पठाण’नंतर शाहरुख ‘जवान’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होणार असून नंतर तो राजकुमार हिरानी यांच्या ‘डंकी’ सिनेमात दिसणार आहे. यात तापसी पन्नू मुख्य भूमिकेत असेल.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
VIDEO| तब्बल 50 वर्षानंतर मुमताज आणि धर्मेंद्र देओल पुन्हा एकत्र, पाहा व्हायरल व्हिडिओ

बिग बॉसची ही स्पर्धक दुसर्यांदा अडकणार लग्न बंधनात; मोठ्या बिझनेसमन बरोबर थाटणार संसार

हे देखील वाचा