स्वत: शाहरुख खानने मुलगा आर्यनला घरात विना शर्ट फिरण्यावर घातली होती बंदी, कारण जाणून तुम्हीही म्हणाल, ‘योग्य निर्णय!’

Shahrukh Khan revealed this is why aryan is not allowed to be shirtless in home


बॉलिवूडमधील रोमान्स किंग शाहरुख खान हा नेहमीच त्याच्या अभिनयाने सर्वांचे मन जिंकत‌ आला आहे. त्याच्या अनोख्या स्टाईलने त्याने नेहमीच सर्वांचे मन जिंकले आहे. त्याने चित्रपटात अनेक अभिनेत्रींसोबत काम केले आहे. पण त्याने नेहमीच त्यांचा आदर केला आहे. चित्रपटाप्रमाणेच वैयक्तिक आयुष्यात देखील तो मुलींचा खूप आदर करतो. त्याचे असे म्हणणे आहे की, पुरुषांना त्याच्या मित्रांमध्ये किंवा नातेवाईकांंमध्ये शर्ट न घालता फिरू नये. हीच शिकवण त्याने त्याचा मुलगा आर्यनला देखील दिली आहे.

शाहरुख खानने 2017 मध्ये फेमिनासोबत चर्चा करताना सांगितले होते की, “मी असं म्हणतो की, कोणत्याही पुरुषाला त्याच्या घरात आई, बहीण किंवा कोणत्याही नातेवाईकांसमोर शर्ट न घालून फिरण्याचा कोणताच अधिकार नाहीये. त्यामुळे मी आर्यनला नेहमी टी-शर्ट घालण्यास सांगत असतो.”

शाहरुख खानने पुढे सांगितले की, “जर तुम्ही तुमची आई, बहीण किंवा एखाद्या मैत्रिणीला विना शर्टचे पाहू शकत नाही, तर तुम्ही त्यांच्याकडून अशी अपेक्षा कशी ठेवता की, त्यांनी तुम्हाला विना शर्टचे बघावे. त्यामुळे अशी कोणतीच गोष्ट करू नका जी एक मुलगी करू शकत नाही.”

शाहरुख खानच्या एका ट्विटरवर एका युजरने त्याला विचारले होते की, तुझ्या मनात महिलांबद्दल एवढा आदर कसा काय आहे?? जेव्हा एका युजरने शाहरुख खानला विचारले होते की, मुलगी पटवण्यासाठी टिप्स दे, तेव्हा त्याने सांगितले होते की, हे अशा प्रकारचे शब्द वापरू नकोस. त्याने सांगितले होते की, “सगळ्यात आधी एका मुलीसाठी पटवणे वैगेरे असे शब्द वापरणे बंद कर. तिच्या सोबत आदराने आणि प्रेमाने बोल.”

शाहरुख खानचे लग्न 1991 मध्ये गौरीसोबत झाले होते. त्याला 3 मुले आहेत. त्यातील मुलांचे नाव आर्यन आणि अबराम आहे, तर मुलीचे नाव सुहाना आहे.

शाहरुख खानच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तो शेवटचा ‘झिरो’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याने अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफसोबत काम केले होते. तो त्याच्या आगामी ‘पठाण’ या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मृत्यूचं सत्र सुरूच! तमिळ अभिनेत्याचे कोरोनामुळे निधन, अवघ्या ४८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

-जेव्हा १६ वर्षीय जन्नत झुबेरच्या किसींग सीनवर भडकली होती आई, वडिलांनी दिली होती अशी प्रतिक्रिया

-‘तेव्हा खिसा रिकामा असायचा, पण…’, म्हणत कपिल शर्माने शेअर केला २३ वर्ष जुना फोटो, सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ


Leave A Reply

Your email address will not be published.