मृत्यूचं सत्र सुरूच! तमिळ अभिनेत्याचे कोरोनामुळे निधन, अवघ्या ४८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Tamil Actor Dies of Covid 19 At The Age of 48


देशभरात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. अशामध्ये रुग्णांना योग्य तो उपचार मिळण्यात समस्या निर्माण होत आहे. यावेळी सामान्य तर सोडाच मोठ- मोठ्या कलाकारांनाही याचा सामना करावा लागत आहे. अनेक दिग्गजांनी आपला जीव गमावला आहे. अशातच आता आणखी एक दु:खद बातमी समोर येत आहे. तमिळ अभिनेता मारन याचेही कोरोना व्हायरसमुळे निधन झाले आहे. तो केवळ ४८ वर्षांचा होता.

मारनला दोन दिवसांपूर्वीच चेंगलपट्टूच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या आकस्मिक मृत्यू झाल्यामुळे चित्रपटसृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तरीही मारनवर पूर्ण उपचार करण्यात आले होते, परंतु त्याच्या नशिबात वेगळंच काही लिहिलं होतं. त्याने बुधवारी (१३ मे) रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाईल.

मारनला गिल्ली आणि कुरुवी यांसारख्या चित्रपटांतील भूमिकेसाठी ओळखले जात होते. याव्यतिरिक्त त्याने ढिशूम, थल्यानगरम आणि बॉस अंगिरा भास्करन यांसारख्या चित्रपटातील आपल्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधले होते. दुसरीकडे दाक्षिणात्य सुपरस्टार पा रंजीतसोबत लवकरच एक चित्रपट येणार आहे, ज्याची शूटिंग आधीपासूनच पूर्ण झाली आहे.

तसेच रंजीत यांची प्रॉडक्शन कंपनी नीलम प्रॉडक्शनने मारनच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

त्यांनी ट्वीट करत लिहिले की, “एक असा अनमोल हिरा, ज्याने नेहमीच प्रत्येक कामामध्ये आपले १००% योगदान दिले. त्याच्या कुटुंबाला आमच्या संवेदना. देव त्याच्या आत्म्याला शांती देवो.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सामान्य व्यक्तींनंतर आता सेलिब्रिटींच्या मदतीलाही धावला सोनू सूद; ‘भज्जी’ हरभजन सिंगला दिले मदतीचे आश्वासन

-‘काळ्या चिमण्या दिसंना झाल्यात, आवरा राव थोडंसं’, शालूचा डान्स पाहून चाहत्याची भन्नाट कमेंट

-पाकिस्तानी पंतप्रधान इमरान खानसोबत लग्नबंधनात अडकणार होती रेखा, अभिनेत्रीची आई कुंडली घेऊन थेट पोहोचली होती ज्योतिषीकडे


Leave A Reply

Your email address will not be published.