Monday, July 1, 2024

‘माझ्या लोकप्रियतेचा माझ्या मुलांवर वाईट परिणाम होऊ शकतो’, शाहरुख खानचा २००८ मधील व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान या दिवसात खूपच चर्चेत आहे. त्याचा मुलगा आर्यन खान हा अं’मली पदार्थांचे सेवन तसेच देवाण-घेवाण केल्याच्या आरोपाखाली आर्थर कारागृहात बंद आहे. यामुळे सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा चालू आहे. अशातच सोशल मीडियावर शाहरुख खानची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे.

यामध्ये त्याने या गोष्टींचा उल्लेख केला आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख खान म्हणतो की, ‘माझे नाव माझ्या मुलांचे आयुष्य खराब करू शकते आणि मी हे मला पाहायचे नाही.’

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ २००८ मधील आहे. त्यावेळी शाहरुख खान जर्मन टीव्ही चॅनेलला मुलाखत देत होता. त्यावेळी त्याचे असे म्हणणे होते की, त्याच्या लोकप्रियतेचा कशाप्रकारे त्याच्या मुलांवर वाईट परिणाम होऊ शकतो. यावेळी तो म्हणताना दिसत आहे की, “आयुष्यात माझ्या परिवाराबाबत माझ्या मनात एक भीती कायम आहे, खास करून माझ्या मुलांसाठी. मी अशी आशा करतो की, ते माझ्या सावलीत राहणार नाही. माझी सर्वात मोठी भीती आहे माझी लोकप्रियता. मला नाही वाटत की, त्यांनी माझ्या लोकप्रियतेशी लढावे आणि विचार करावा की, मी माझ्या वडिलांपेक्षा जास्त चांगला आहे. मला नाही वाटत की, त्यांच्या मनात हा विचार कधीही यावा की, मी शाहरुख खानचा मुलगा आहे आणि मला सगळ्या गोष्टी खूप सहज मिळू शकतील.”

शाहरुख खान पुढे म्हणाला की, “मला नाही वाटत की, माझ्या लोकप्रियतेचा त्यांच्या आयुष्यावर वाईट परिणाम व्हावा. त्यांनी मला केवळ एक वडील म्हणूनच ओळखावे. मला नाही वाटत की, त्यांना उद्या जाऊन कोणी शाहरुख खानचा मुलगा या नावाने ओळखावे. त्यांनी त्यांची ओळख स्वतः कमवावी आणि चांगले काम करून लोकप्रियता मिळवावी.”

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला २ ऑक्टोबरला एनसीबीने क्रूझ शिपमध्ये पडकले होते. त्याच्यावर अं’मली पदार्थांचे सेवन केल्याचे आणि देवाण-घेवाण केल्याचा आरोप आहे. तो सध्या आर्थर कारागृहात आहे. त्याला अजूनही जामीन मिळाला नाही. याआधी न्यायालयाच्या अनेक तारखा मिळाल्या होत्या. परंतु न्यायालयाने त्याचा जामीन नाकारला आहे. अशातच शाहरुख खानचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सर्वत्र जोरदार चर्चा चालू आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘अरे बिचाऱ्या मुलांवर जरा दया दाखवा’, राखी सावंतचा आर्यन अन् अनन्याला पाठिंबा

-असं काय झालं की, स्वरा भास्कर ट्वीट करत म्हणाली, ‘एक हिंदू असल्याची लाज वाटते’, घ्या जाणून

-गृहमंत्री अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे साराला पडले महागात, सोशल मीडियावर होतेय ट्रोल

हे देखील वाचा