Sunday, April 14, 2024

शाहरुख खानला महिला चाहतीने जबरदस्तीने केले किस; काय म्हणाले युजर वाचा एकदा

बॉलीवूडचा बादशाह म्हणजेच शाहरुख खान याचे फॅन फॉलोइंग भारतातच नाही, तर परदेशातही खूप आहेत. अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. अशात शाहरुख खान देखील अनेकदा आपल्या चाहत्यांचे मनापासून स्वागत करतो. शाहरुख चाहत्यांशी प्रेमाने वागतो. शाहरुखच्या या वागणुकीमुळे त्याचे सर्वत्र तोंडभरून कौतुक देखील केले जाते. मात्र, यावेळी शाहरुखला त्याची ही सवय महागात पडली आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानशी (Shahrukh Khan) संबंधित प्रत्येक बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरते. शाहरुख खानशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्स प्रचंड संतापलेले दिसत आहेत. कारण या व्हिडिओमध्ये एक महिला शाहरुख खानला जबरदस्तीने किस करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

शाहरूख नुकताच एका कार्यक्रमात उपस्थित राहिला होता. दुबईमध्ये त्याने मित्राच्या रिअल इस्टेट ब्रँडची जाहिरात केली होती. त्यावेळी एक भयानक किस्सा घडला आहे. त्यावेळचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की खुद्द शाहरुख खानही महिलेच्या या कृत्याने हैराण झाला आहे.

 हा व्हिडिओ दुबईतील आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला शाहरुख खानकडे येते, त्यानंतर ती अचानक शाहरुख खानला जवळ येतेय या वेळी शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी आणि अंगरक्षक ही दिसत आहेत. तेव्हा या महिलेने हस्तांदोलन केले आणि नंतर त्याच्या हाताचे चुंबन घेतले. त्यानंतर ती महिला परवानगीशिवाय शाहरुखला गालावर किस करते.

हा व्हिडिओ पाहून यूजर संतापले आहेत. एकाने कमेंट करताना लिहिले की, ‘हेच एखाद्या अभिनेत्रीसोबत घडलं असतं तर चाललं असतं का?’. दुसऱ्याने लिहिले की, ‘या महिलेने शाहरुखला किस करण्यापूर्वी परवानगी घेतली होती का?’ हा काही मिनिटांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. (Shahrukh Khan was forcibly kissed by a female fan)

अधिक वाचा-
मराठमोळ्या उर्मिलाच्या हाॅटनेसचा कहर; पहा फोटो
क्रितीचं तुरुणाईला घायळ करणार साैंदर्य, फाेटाे एकदा पाहाच

हे देखील वाचा