अभिनेते दिलीप कुमार यांच्या अंत्यदर्शनासाठी जाताना शाहरुख खानने पोलिसांना पाहून केले ‘असे’ काही; होतंय कौतुक


हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. बुधवारी (७ जुलै) सकाळी ७.३० वाजता हिंदुजा रुग्णालयात दिलीप कुमार यांनी वयाच्या ९८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार बर्‍याच दिवसांपासून आजारी होते. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून तर काहीही प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अभिनेते धर्मेंद्र, विद्या बालन आणि तिचे पती सिद्धार्थ रॉय कपूर, शबाना आझमी, जॉनी लिव्हर, रणबीर कपूर, शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदी अनेक मान्यवरांनी, कलाकारांनी दिलीप साहेबांच्या घरी जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी दिलीप कुमार आणि सायरा बानो यांचा मानसपुत्र असलेला शाहरुख खानदेखील दिलीप कुमारांचे अंत्यदर्शन घ्यायला आणि सायरा बानो यांना आधार द्यायला त्यांच्या घरी पोहचला होता. त्यावेळेचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाहरुख जेव्हा दिलीप साहेबांच्या घरी पोहोचला, तेव्हा त्याने असे काही केले, ज्यामुळे आज त्याचे खूप कौतुक होत आहे.

यावेळी शाहरुख खानने त्याची उत्तम शिकवण दाखवली. दिलीप कुमार यांच्या घराबाहेर मोठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. पोलिसांचा मोठा फौजफाटा यावेळी तिथे होता. शाहरुख जेव्हा तिथे पोहोचला, तेव्हा तो पोलिसांना बघून वाकला आणि त्यांना मान दिला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याच्या या कृत्यामुळे सर्वच स्तरातून शाहरुखचे कौतुक होत आहे.

दिलीप कुमार आणि शाहरुख खान यांचे खास नाते होते. दिलीप कुमार शाहरुखला आपला मुलगा मानत होते. त्यांना भेटण्यासाठी शाहरुख अनेक वेळा दिलीप साहेबांच्या घरीही जायचा. सायरा बानो यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, “आमचा मुलगा असता तर तो हुबेहूब शाहरुखप्रमाणे दिसला असता. शाहरुख आणि दिलीप साहेबांचे केस एकसारखेच आहेत. याच कारणांमुळे मी जेव्हा शाहरुखला भेटते, तेव्हा त्याच्या केसांमधून हात फिरवते.” याव्यतिरिक्त शाहरुखने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, “माझी आई नेहमी म्हणायची की, मी दिलीप कुमारांसारखा दिसतो.”

दिलीप कुमार यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नसीरुद्दीन शाह यांना ८ दिवसांनी मिळाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, मुलाने फोटो शेअर करत दिली माहिती

-कियारासाठी वयस्कर व्यक्तीने गाडीचा दरवाजा उघडत ठोकला सलाम; नेटकरी म्हणाले, ‘तुझ्या वडिलांपेक्षा जास्त…’

-अजय देवगणच्या ओटीटी पदार्पणासोबतच कमबॅक करणार ‘ही’ अभिनेत्री; कित्येक वर्षांपासून आहे मोठ्या पडद्यापासून दूर


Leave A Reply

Your email address will not be published.