Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘असे काही कार्यक्रम आहेत जे अश्लीलता…’ म्हणत, तारक मेहताने कपिल शर्माच्या प्रश्नाला दिले उत्तर

तारक मेहता का उल्टा चश्मा‘ फेम शैलेश लोढा आपल्या अभिनयासोबतच आपल्या कवितांसाठी देखिल ओळखले जाते. त्यांनी अनेक कार्यक्रमामध्ये आपल्या कवितांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. काही दिवसांपूर्वी शैलेशने ‘कपिल शर्मा शो‘ मध्ये हजेरी लावली होती, तेव्हा देखिल त्याने आपल्या कविता सादर केल्या होत्या. मात्र, कपिल शर्मी याने अभिनेत्याला असा प्रश्न विचारला ज्याचे उत्तर खूप तिखट शब्दात मिळाले होते, ती व्हिडिओक्लीप जोरदार व्हायरल झाली असून शैलेशने यावर नवीन वक्तव्य केले आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लीपमध्ये कपिल शर्मा (Kapil Sharma) याने अभिनेता शैलेश लोढा (Shailesh Lodha) याला असा काही प्रश्न विचारला ज्यावर शैलेश कपीलला ‘फूहङ’ असे बोलतो ज्याचा अर्थ ‘अनाडी’ असा होतो. या सिनची एक व्हिडिओ क्लीप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होते आहे. अनेक लोकांनी ही  व्हिडिओक्लीप तुफान व्हायरल केली होती. त्यामुळे शैलेशने या व्हायरल व्हिडिओवर वक्तव्य केले आहे, ज्यामुळे शैलेश लोढा खूपच चर्चेत आला आहे.

माध्यमातील वृत्तानुसार शैलेशने एका मुलाखतीदरम्यान व्हिडिओबद्दलची माहिती देत सांगितले की, “ही गोष्ट वेगळी आहे, हे मी कधीच बोललो नाही. मी फक्त एवढेच बोललो टीव्हीवर असे काही कार्यक्रम आहेत जे अश्लील असतात. जिथे एक आज्जी लोकांची पप्पी घेत असते. हे त्याप्रकारच्या कंटेट बद्दल आहे. मला वाटत आहे की, कॉमेडी करण्याचा एक चांगला उपाय आहे. हे कधीच कोणत्या कार्यक्रमाबद्दल न्हवतं. लोकांनी याला भलत्याच गोष्टीला जोडले आहे. मी आणि कपिलने एका मंचावर काम कार्यक्रम केला आहे.”

शैलेश कपिलबद्दल बोलला होता की, मी काही कार्यक्रम पाहतो, जे पाहून मला खूप लाज वाटते. एक एशी आज्जी आहे जी, प्रत्येक व्यक्तीला किस करण्याचा प्रयत्न करत असते. अशी आत्या आहे जी, लग्नासाठी व्याकुळ आहे. एक पती जे आपल्या पत्नीचा तिरस्कार करत आहे. मी ज्या कार्यक्रमामध्ये काम करत आहे, त्यामध्ये एक मुलगा प्रत्येक गोष्टीला आपल्या वडीलांच्या पाया पडत असतो. एक नातू आहे, जो आपल्या आजोबंचा सन्मान करत असतो. आम्ही एका अशा सोसायटीमध्ये राहत आहे, जिथे हिंदू, सिख, पंजाबी, आणि ईसाई लोक राहतात.

शैलेशने आपल्या वक्तव्याद्वारे स्पष्ट केले आहे की, त्याने कधीच कोणत्या कार्यक्रमाची निंदा केली नाही. त्याची आणि कपिलची खूप चांगली मैत्री आहे. या दोघांनी कपिल शर्मा शोमध्ये एकत्र कविता आणि गाणी देखिल गायले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
तब्बल 43व्या वर्षी आई होणार अमृता सुभाष, सोशल मीडियावर पोस्ट होतेय व्हायरल…
हॉलिवूडवर पसरली शोककळा! जेरी ली लेवीसने 87व्या वर्षी मिटले डोळे…

हे देखील वाचा