Wednesday, July 2, 2025
Home कॅलेंडर शक्तिमानच्या गर्लफ्रेंडचा रोल करणारी ‘गीता विश्वास’ आठवतेय? पाहा कशी दिसतेय आता गीता

शक्तिमानच्या गर्लफ्रेंडचा रोल करणारी ‘गीता विश्वास’ आठवतेय? पाहा कशी दिसतेय आता गीता

देशात नव्वदच्या दशकात ‘शक्तिमान’ हा पहिला टेलीव्हीजन सुपरहिरो म्हणुून अतिशय लोकप्रिय ठरला होता. लहान मुले तर या शोची अतिशय आतुरतेने वाट पाहत असायचे. याचे कारण ‌अ‌ॅक्शनसह या शोच्या माध्यमातून शक्तिमान मुलांना विविध संदेश देखील द्यायचा. या मालिकेत काम केलेल्या सर्वच कलाकारांनी एक खास विक्रमही केला होता. ते भारतातील घराघरांत पोहचले होते.

मालिकेतील सर्वच कलाकारांना लोकं आजही त्यांच्या मालिकेतील नावावरुनच ओळखतात. याच मालिकेत काम केलेलं एक लोकप्रिय नाव म्हणजे गीता विश्वास. गीता विश्वासचा रोल हा वैष्णवी महंत या अभिनेत्रीने केला होता. वैष्णवीने ९ सप्टेंबर २०२० रोजी आपला ४६वा वाढदिवस साजरा केला. या खास लेखात आपण शक्तिमानमधील याच वैष्णवी महंत अर्थात गीता विश्वासबद्दल जाणून घेणार आहोत.

Photo Courtesy ScreengrabYoutubeZee TV

वैष्णवीचा जन्म ९ सप्टेंबर १९७४ रोजी मायानगरी मुंबईत झाला. तिचे वडील हिंदू तर आई ख्रिश्चन होती. तिचा परिवार एखाद्या चित्रपटाच्या स्टोरीप्रमाणेच हैदराबाद ती लहान असतानाच हैदराबादला शिफ्ट झाला. त्यावेळी वैष्णवीला शास्त्रज्ञ व्हायचं होतं. जेव्हाही सुट्ट्यांच्या दिवसात ती मुंबईला येत असे तेव्हा तीला आपण एकदिवस चित्रपटात काम करु याचा अंदाजही नव्हता. याच मुंबईत तिला रामसे ब्रदर्सच्या हॉरर चित्रपट ‘वीराना’ मध्ये कामाची संधी मिळाली. तेव्हा वैष्णवीचे वय होते जेमतेम १४ वर्ष.

Photo Courtesy ScreengrabYoutubeZee TV

एकवेळ शास्त्रज्ञ होण्याची स्वप्न पाहणारी वैष्णवी हळूहळू अभिनय क्षेत्रातच करियर करण्याचा विचार करु लागली. त्यानंतर तीने ‘लाडला’, ‘बंबई का बाबू’, ‘दानवीर’, ‘बाबुल’ सह अनेक चित्रपटात काम केलं. त्याचबरोबर तीने दक्षिणेतही चित्रपट सृष्टीत बरंच काम केलं. परंतू तिला चित्रपटात अपेक्षित यश मिळालं नाही.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

याचदरम्यान १९९७ला दुरदर्शनवर शक्तिमान ही भारतातील पहिली सुपर हिरोची मालिका सुरु झाली. यात गीता विश्वासची भुमिका वैष्णवीला मिळाली. आणि तीचे नशीब पालटले. तिला गावखेड्यापासून ते शहरांमध्ये गीता नावाने ओळखले जाऊ लागले. तिची लोकप्रियता इतकी वाढली की जेव्हा तिच्या भूमिकेला या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला तेव्हा दर्शकांनी तीचा रोल पुन्हा सुरु करण्यासाठी दुरदर्शनला अनेक पत्रे लिहीली होती. ती या मालिकेत एका पत्रकाराची भूमिका करत होती आणि तिनेच आपल्या भूमिकेतून जगाला शक्तिमानची पहिल्यांदा ओळख करुन दिली होती. तीने या मालिकेत १९९७ पासून ते २००५ पर्यंत तब्बल ८ वर्ष काम केले.

Photo Courtesy ScreengrabYoutubeZee TV

वैष्णवीने पुढे ‘छूना है आसमान’, ‘सपने सुहाने लड़कपन के’, ‘टशन है इश्क’, ‘यह उन दिनों की बात है’, ‘हम पांच फिर से’, ‘कसौटी जिंदगी की’, ‘एक लड़की अनजानी सी’, ‘मिले जब हम तुम’, ‘दिल से दिल तक’ आणि ‘मिटेगी लक्ष्मण रेखा’ सारख्या मालिकांत दर्जदार भूमिका केल्या. आजही ती याच इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. सध्या दंगल टिव्हीवरील ये मेरे हमसफर मालिकेत ती भूमिका करत आहे. तिला भारतीय मालिकांतील भूमिकांसाठी दिले जाणारे अनेक पुरस्कार मिळाले आहे.

हेही वाचा-
सिद्धार्थ- मितालीचे लोणावळ्यातील रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल; एकदा पाहाच
प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्माने शेअर केले बोल्ड फोटो; ट्रोलर्सने ड्रेसला म्हटले,  गाडीचा कव्हर 
हॉट लुक! बिकिनीवरील आलियाचे फोटो व्हायरल, सोशल मीडियावर पडतोय कमेंट्सचा पाऊस

 

हे देखील वाचा