सिद्धार्थ- मितालीचे लोणावळ्यातील रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल; एकदा पाहाच

Marathi Actor Siddharth Chandekar enjoys a quick getaway with wife Mitali Mayekar in Lonavla; see pics


महाराष्ट्राचा लाडका अभिनेता सिद्धार्थ चांदेकर मागील महिन्यात २४ जानेवारीला मराठमोळी अभिनेत्री मिताली मयेकरसोबत लग्नबंधनात अडकला. त्यांचे लग्न पुण्यातील ढेपे वाड्यात दिमाखात पार पडले. त्यांच्या लग्नातील सुंदर फोटो व्हायरल झाले. लग्नानंतर ही मराठमोळी जोडी लोणावळ्याच्या मचान रिसॉर्टला गेली होती. यादरम्यानचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ते दोघेही या फोटोंमध्ये सुंदर दिसत आहेत.

इंस्टाग्रामवरील एका हँडलने सिद्धार्थ आणि मितालीचे मचान येथील काही फोटो शेअर केले आहेत. यासोबतच मिताली एका फोटोमध्ये बाथटबमध्ये बसल्याचे दिसत आहे.

याव्यतिरिक्त दुसऱ्या फोटोमध्ये मिताली आणि सिद्धार्थ एकमेकांना किस करताना दिसत आहेत.

मितालीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने बालकनीमधील फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले की, ‘आनंदी दिवस!’

त्याचसोबत पती सिद्धार्थसोबत फोटो शेअर करत तिने लिहिले आहे की, ‘नेहमी आनंदात…’

तिने एन्जॉय करतानाचा फोटो शेअर केला आहे. त्याला कॅप्शन देत तिने लिहिले की, ‘चिल्ल झोन!’

सिद्धार्थ आणि मितालीचे लग्न थाटामाटात पार पडले. यानंतर सिद्धार्थने नुकतेच आपल्या संपूर्ण टीमचे आभार मानले, ज्यांनी हा एक भव्य कार्यक्रम होण्यासाठी खूप प्रयत्न केले होते.

मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी पुण्याजवळ डेस्टिनेशन वेडिंगचा पर्याय निवडला होता. हे पारंपारिक महाराष्ट्रीयन पेशवे शैलीतील लग्न होते. सई ताम्हणकर, अभिज्ञा भावे या कलाकारांनी या लग्नात उपस्थित राहून या जोडप्याला शुभेच्छा दिल्या.

सिद्धार्थ आणि मिताली लग्नाच्या २ वर्षापूर्वीपासून एकमेकांना डेट करत होते. तसेच ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. एकमेकांसोबत चांगला वेळ घालवल्यानंतर या जोडप्याने त्यांचे नाते पुढे नेण्याचे ठरवले.

हेही वाचा-

अखेर विकेट पडली! अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांचा विवाहसोहळा संपन्न; पाहा फोटो

अरं हलद लागली…! सिद्धार्थ-मितालीची लगीनघाई, हळदीचे फोटो आले समोर; पाहा झक्कास फोटो


Leave A Reply

Your email address will not be published.