Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

शनाया कपूरच्या बेली डान्सचा सोशल मीडियावर राडा; अमिताभ बच्चन यांच्या नातीच्या कमेंटने वेधले लक्ष

बॉलिवूडमध्ये नुकतेच अनेक स्टारकिड्सने पदार्पण केले आहे, तर आगामी काळात अनेक स्टारकिड्स त्यांच्या या पदार्पणासाठी सज्ज झाले आहेत. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वीच सर्व स्टारकिड्स खूप लोकप्रिय झाले आहेत. त्यांना सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स देखील आहेत. या स्टार्सकिड्सला त्यांच्या फॅन्सला लवकरच सिनेमात पाहण्याची इच्छा असते. आगामी काळात शनाया कपूर ही मोठ्या पाड्यावर आगमन करणार आहे. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वीच शनायाने तिचे नाव तयार केले आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असणाऱ्या शनायाने नुकताच तिचा एक बेली डान्स व्हिडिओ पोस्ट केला आहे.

चित्रपटांमध्ये पदार्पण करताना शनाया स्वतःला सर्वच बाबतीत परिपूर्ण करण्यासाठी मेहनत घेताना दिसत आहे. शनायाचा अभिनय कसा असेल, हे तर येणारा काळच सांगेल. मात्र, सध्या तिने तिच्या सौंदर्याने आणि डान्सने लोकांना वेड लावायला सुरुवात केली आहे.

शनायाने नुकताच तिचा बेली डान्स करतानाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमधून तिने तिचे डान्समधील प्राविण्य दाखवून दिले आहे. शनायाने बेली डान्सचे प्रशिक्षण घेतले आहे. तिचा हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यावर नव्या, सुहाना खान, अनन्या पांडे, संजय कपूर, सीमा खान आदी लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाच्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिने कमेंट करत लिहिले की, “व्हिडिओ पाहूनच पोट दुखायला लागले.”

मागच्या वर्षी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या ‘फॅब्युलस लाईफ्स ऑफ बॉलिवूड वाईफ्स’ ही वेबसीरिज प्रदर्शित झाली होती. यामध्ये संजय कपूर आणि शनाया कपूर यांचे बाँडिंग दिसून आले होते. शनाया कपूर ही अभिनेता संजय कपूरची मुलगी, अनिल कपूर, बोनी कपूरची पुतणी आणि सोनम कपूर, जान्हवी कपूर, अर्जुन कपूर यांची बहीण आहे.

शनाया जरी लवकरच अभिनयात पदार्पण करत असली, तरीही तिने जान्हवी कपूरच्या ‘गुंजन सक्सेनाः द कारगिल गर्ल’ या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शकाचे काम केले आहे. शनाया लवकरच करण जोहरच्या चित्रपटातून अभिनयात पदार्पण करणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भारीच ना! मिलिंद सोमण यांच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण; रोमँटिक फोटो शेअर करून दिल्या पत्नीला शुभेच्छा

-अली गोनीकडे सध्या नाहीये कोणताच प्रोजेक्ट; वाढलेलं वजन आहे का यामागचं कारण??

-‘मी अंतर्वस्त्र घालायचे की नाही, ही माझी चॉईस…’, कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना हेमांगी कवीने दिली जोरदार चपराक

हे देखील वाचा