संजय लीला भन्साळी हे नाव समोर आले की, आधी डोक्यात येते मोठे सिनेमे, भव्य सेट, उत्तम संगीत, श्रवणीय गाणी, दर्जेदार कलाकार एकूणच काय तर एक सिनेमा हिट होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे, त्या सर्वच त्यांच्या सिनेमांमध्ये असतात. भन्साळी यांच्या सिनेमांचे बजेट देखील अवाढव्य असते. त्यांचे सेट पाहूनच सिनेमाची भव्यता लक्षात येते. त्यांचे सेट पाहून सामान्य लोकंच नाही तर कलाकार देखील दंग राहतात. असाच काहीसा अनुभव आला होता अभिनेता शरद केळकरला. नुकतंच त्याने एका मुलाखतीमध्ये याबद्दल सांगितले.
शरद केळकरने संजय लीला भन्साळी यांच्या ‘गोलियों की रासलीला राम लीला’ सिनेमात काम केले होते. त्याआधी तो फक्त टीव्ही शो करायचा. त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा तो सिनेमाच्या सेटवर गेला तेव्हा त्याला सेट पाहून वाटले की किती पैसा वाया घातला जातो. मात्र त्यानंतर त्याचा विचार बदलला कसा बदलला आणि का याबद्दल जाणून घेऊया.
View this post on Instagram
नुकतीच शरदने एक मुलाखत दिली त्यावेळी त्याने त्याच्या संघर्षाच्या दिवसांबद्दल आणि टीव्ही शोबद्दल भाष्य केले. तो म्हणाला, “माझे टीव्हीवर चांगले काम चालू होते. पैसे देखील चांगले मिळत होते. मात्र मला असे वाटत होते जाणून घ्यायचे होते की, मी चित्रपट केले तर माझ्यासाठी, करियरसाठी काय बदल होतील? माझ्या सुरुवातीच्या सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे रामलीला. या सिनेमाचा सेट फिल्मसिटीमध्ये लावण्यात आला होता. माझ्या शूटिंगच्या पहिल्याच दिवशी तिथे १००० लोकांची गर्दी होती. सोबतच क्रू आणि मुख्य कलाकार देखील होते. आमच्याकडे सर्वापेक्षा एक दिवस अधिकच वेळ होता. मी सेट पाहून मनात विचार करत होतो, किती पैसे वाया घालवतात हे लोकं एवढ्यात तर मी १५ मिनिटांचे शूट केले असते. असा विचार माझ्या मनात येणे साहजिक होते कारण मी टीव्हीवरून आलो होतो.”
पुढे त्याला विचारले गेले की, खरच त्याला वाटते की वेळ आणि पैसे सेटसाठी वाया घालवले जातात? यावर तो म्हणाला, “नाही मला असे वाटत नाही. जेव्हा मी या सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आणि स्क्रिनींगला सिनेमा पहिला तेव्हा मी बाहेर आलो आणि संजय सरांना मिठी मार्ट म्हणालो आता माझ्या लक्षात आले, मोठा आणि भव्य चित्रपटाचा अर्थ. कारण मला फक्त काम संपवण्याची सवय होती. चित्रपटांसाठी तुम्हाला वेळ काढावा लागतो. संजय सरांना नक्कीच हॅट्स ऑफ कारण त्यांना चित्रपट निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या सर्वच पैलूंची जाण आहे.”
दरम्यान रामलीला या सिनेमात दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत होते. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांचा झाला ‘रहस्यमयी’ मृत्यू घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला होता मृतदेह
‘आदिपुरुषला बॉयकॉट करा’ म्हणत नेटकऱ्यांनी चित्रपटाच्या नव्या पोस्टरवरील ‘त्या’ चुकीवर घेतला आक्षेप