Friday, July 5, 2024

मुंबई- दिल्ली संघातील सामन्याचा निकाल शरद केळकरच्या लागला जिव्हारी; फोटो पाहून तुम्हालाही कळेल त्याचं दु:ख

क्रिकेट हा सर्वांचाच आवडीचा विषय आहे. त्यातल्या त्यात इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) म्हणजे जीव की प्राण. आयपीएलचे आकर्षण सर्व सामान्यांप्रमाणेच कलाकारांनाही असते. कलाकार अनेकदा सामन्यात होणाऱ्या विजय- पराभवावर आपल्या प्रतिक्रिया देताना दिसतात. आता असेच काहीसे पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे.

शनिवारी (२ ऑक्टोबर) आयपीएल २०२१ मधील डबल हेडर सामने झाले. यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. या सामन्यात मुंबईला पराभवाचा‌ सामना करावा लागला, तर दिल्ली कॅपिटल्स विजयी ठरला. अशामध्ये मुंबई इंडियन्सचा चाहता असलेला अभिनेता शरद केळकरने, संघाच्या पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे. या मजेदार प्रतिक्रियेमुळे अभिनेता भलताच चर्चेत आला आहे. (sharad kelkar’s reaction on ipl match between mumbai indians and delhi capital)

शरद केळकरने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने स्वतःचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, अभिनेता रागात दिसत आहे. एका झाडावर हात टेकवून तो एकटक बघत आहे. हा फोटो शेअर करत अभिनेता म्हणतोय की, “मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये झालेल्या सामन्यानंतर मी!” शरदच्या या मजेदार पोस्टवर बऱ्याच प्रतिक्रिया उमटत आहेत.

https://www.instagram.com/p/CUjXlOTlppH/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेता शरद केळकर हा सिनेसृष्टीतला प्रतिभावान अभिनेता आहे. त्याने अभिनयाच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजवर अनेक चित्रपटात उल्लेखनीय भूमिका साकारून त्याने मोठा चाहतावर्ग कमावला आहे. ‘लक्ष्मी’ चित्रपटात किन्नरच्या भूमिकेत शरद केळकरचे बरेच कौतुक झाले होते. यात तो पाहुणा कलाकार म्हणून दिसला होता. याशिवाय ‘तानाजी’ मधील त्याच्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भयावह! बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांना आलाय खऱ्या भूतांचा अनुभव, ऐकून तुमचाही उडेल थरकाप

-Bigg Boss 15: यावेळी जंगल थीमवर बनलंय ‘बिग बॉस’चं घर, फोटो पाहून तुम्हीही कराल कौतुक

-मैत्रिणींसह भटकंतीला निघाली जान्हवी कपूर, निसर्गाच्या सानिध्यात घालवतेय वेळ

हे देखील वाचा