Saturday, March 2, 2024

सहपत्नी शरद पवारांनी पाहिला ‘सत्यशोधक’ चित्रपट, थिएटरमधून बाहेर येताच राज्य सरकारला केली ‘ही’ विनंती

सध्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सामाजिक संदेश देणारे तसेच इतर काही कथांवरील चित्रपट येत आहेत. सगळ्या चित्रपटांची सध्या जोरदार चर्चा चालू आहेत. परंतु यातील एक चित्रपट म्हणजे सत्यशोधक हा चित्रपट चांगला चर्चेत आहे. या चित्रपटात महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्याची संघर्ष गाथा दाखवण्यात आलेली आहे. या चित्रपटाला सर्व वर्गातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सत्यशोधक हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. अनेकजण हा चित्रपट जाऊन पाहत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी देखील हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहिला आहे. एवढेच नाही तर त्यांनी त्यांच्या पत्नीसोबत हा चित्रपट पाहिलेला आहे. आणि या चित्रपटाबद्दल त्यांनी सकारात्मक प्रक्रिया प्रतिक्रिया देखील दिलेली आहे.

त्यांनी या चित्रपटासंदर्भात काही व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी हा चित्रपट शालेय विद्यार्थ्यांना दाखविण्यात यावा. अशी मागणी देखील राज्य सरकारकडे केलेली आहे. त्यांनी हे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून लिहिलेले आहे की, “अतिशय उत्तम चित्रपट आहे महात्मा फुलेंचे जे आयुष्य आहे. त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग आहे ते वास्तव रूपाने या ठिकाणी मांडण्यात आलेले आहे. मला स्वतःला असं वाटतं की, महाराष्ट्रातील सगळ्या शाळांमध्ये हा चित्रपट दाखवला पाहिजे राज्य सरकारला ही विनंती.”

यादी हा चित्रपट करमुक्त दाखवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सत्यशोधक समाज हा चित्रपट करमुक्त दाखवण्यात यावा अशी मागणी केली होती.

या चित्रपटातील स्टारकास्टबद्दल सांगायचे झाल्यास या चित्रपटात मुख्य भूमिकेमध्ये संदीप कुलकर्णी आहे ज्यांनी महात्मा फुले यांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री राजश्री देशपांडे यांनी सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारली आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटात इतर अनेक कलाकारांची देखील खास पात्र आहेत प्रवीण तायडे यांनी सत्यशोधक या चित्रपटाची निर्मिती देखील केलेली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

आयरा खानच्या रिसेप्शनला का नव्हती सावत्र आई किरण राव? मोठे कारण आले समोर
मालदीव बॉयकॉटनंतर सुपरस्टार नागार्जुन यांनी कॅन्सल केले मालदीवचे प्लॅन; म्हणाला, ‘त्यांनी पंतप्रधानांना ज्या प्रकारे वागणूक दिली…’

हे देखील वाचा