Thursday, June 13, 2024

अभिनेते शरद पोंक्षे यांनी सोनाली कुलकर्णीची मागितली होती माफी? वाचा सविस्तर

मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी नाटक, चित्रपट, मालिका व आपल्या परखड विचाराने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. आपल्या अभिनयाबरोबरच शरद पोंक्षे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेही नेहमीच चर्चेत असतात. नुकतेच शरद पोंक्षे यांनी एक मुलाखतीत मुलाखत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची माफी मागितल्याचा किस्सा सांगितला.

शरद पोंक्षे  (sharad ponkshe)यांनी एक किस्सा सांगितला आणि सोनालीची माफी मागण्याचं कारण स्पष्ट केलं. ते म्हणाले, ” ‘संस्कृती कलादर्पण’ने मला पुरस्कार दिला होता. नथुराम गोडसे या नाटकाचे 700प्रयोग झाल्यानंतर लक्षवेधी अभिनेता म्हणून त्यांनी मला पुरस्कार दिला. 700 प्रयोग लागले लक्ष वेधून घ्यायला; मग सर्वोकृष्ट अभिनेत्यासाठी मला अजून 700 प्रयोग करावे लागणार, असं भाषण मी केलं होतं. मी तिथे खूप बोललो. म्हटलं की, “तुम्ही जे काही पुरस्कार सोहळे करता, ते इतके रटाळ व कंटाळवाणे असतात. तेच तेच झालंय. असे दोघे कोणीतरी येतात आणि समोर दिलेलं सगळं वाचतात. मग पुढे बोलत असताना मला खाली बसलेली सोनाली कुलकर्णी दिसली. म्हटलं की, या बिचाऱ्या सोनाली कुलकर्णी (sonali kulkarni)सारख्या पोरी वर्षानुवर्षं त्याच त्याच गाण्यावर तासं तास नाचतात. हे जरा बदला. विनंती आहे की, हा पॅटर्न बदला.

या प्रकरणाला दोन-तीन महिने गेले. माझ्या लक्षात आलं की, मी उगीच त्या सोनाली कुलकर्णीला बोललो. माझा उद्देश तिला दुखावण्याचा नव्हता. माझं मत होतं की, फक्त पॅटर्न बदला. कारण- त्या पुरस्कार सोहळ्यात ते कोणी दोघं अद्वितीय असं काही निवेदन करतात की, ते कंटाळवाणं, रटाळ असतं. मेकअप रूममधले किस्से सांगतात; ज्याचा प्रेक्षकांशी काही संबंध नसतो. मग आपले सगळे कलाकार ओरडत असतात. म्हणून मी त्या दिवशी त्या सोहळ्यात सगळं बोललो. त्यामुळे खूप लोक नाराज झाले. पुरस्कार घेतो आणि आपली अब्रूही काढतो, असं म्हणाले होते.

पुढे पोंक्षे म्हणाले, “ही घटना आठवल्यानंतर मग मी सोनालीला फोन लावला. सोनालीला म्हटलं, कधीपासून मनात होतं. मला माफ कर. तुला अजिबात दुखवायचं नव्हतं. मी तुझी क्षमा मागण्यासाठीच हा फोन केला. हे ऐकून सोनाली म्हणाली, ‘अरे दादा. तू प्लीज असं काही बोलू नकोस.’ तिच्या मनात काही राहायला नको म्हणून त्या वेळेस मी तिला फोन करून बोलून मोकळा झालो.(sharad ponkshe apologized to sonali kulkarni know reason)

अधिक वाचा-
‘माझी बायको, माझे वेड आणि…’; पत्नीच्या वाढदिवसानिमित्त रितेशने केली ‘ती’ पोस्ट चर्चेत
‘सैराट’फेम रिंकू राजगुरुने शेअर केला पहिल्यांदा नाटक पाहण्याचा अनुभव; म्हणाली, ‘असं नाटक…’

हे देखील वाचा