Tuesday, May 28, 2024

महाराष्ट्रातील राजकीय भूकंपावर सोनाली कुलकर्णींने मांडले मत; पोस्ट शेअर करत म्हणाले, “पाऊस आणि…”

रविवारी (2 जूलै) महाराष्टाच्या राजकारणात मोठी उलथपालथ झाली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी केली. त्यानंतर अजित पवार यांनी करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. इतकंच नाही तर त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी अजित पवारांसोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, संजय बनसोड, बाबूराव अत्राम, अनिल भाईदास पाटील यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या सर्व प्रकरणावर मनोरंजनसृष्टीतील कलाकार देखील व्यक्त होत आहेत.

यावर अभिनेत्री सोनाली कुलकर्णींने (Sonali Kulkarni) देखील इन्स्टाग्राम स्टोरी टाकली आहे. जी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. तिने स्टोरी टाकताना लिहिले की, ‘पाऊस आणि भूकंप एकत्र? हे चाललंय तरी काय?” तसेच तिने रिअॅक्ट बारमध्ये ‘मजाक’ लिहिल आहे. सोनालीची ही स्टोरी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

सोनाली व्यतिरिक्त अनेक मराठी कलाकारांनी या राजकीय घडामोडीवर आपलं मत व्यक्त केलं आहे. मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशीने देखील यावर ट्वीट केलं आहे. त्याने ट्विट करताना लिहिले की, ‘उत्तम पटकथा लिहिण्याची कला.’ त्याच हे ट्विट राजकीय परिस्थीवर असल्याचा अंदाज बांधला जात आहे. पण त्याने या ट्विटमध्ये कोणत्या राजकीय परिस्थीतीचा किंवा नेत्याचा संदर्भ दिलेला नाही.

यावर नेटतऱ्यांनी खूप कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट करताना लिहिले की. ‘साडेतीन वर्षात तीनदा मुख्यमंत्री, तुम्हाला संधी मिळाल्यास नक्की करा चित्रपट.’ अजित पवारांच्या शपथविधीनंतर राज्यात दोन मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे चर्चेला उधान आले आहे.

दरम्यान, गेल्या तीन वर्षात अजित पवार एकदा नाही, दोनदा नाही, तर तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहे. त्यामुळे जोरदाक चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. (Sonali Kulkarni expressed her opinion on the political earthquake in Maharashtra)

अधिक वाचा- 
– नातेवाईक नव्हे तर सख्ख्या आई बापामुळेच लहानपणी रडलीये भारती सिंग
पहिला सिनेमा मिळवण्यासाठी कार्तिक आर्यनने पाहिली तीन वर्ष वाट, मोठ्या संघर्षाने मिळवले यश

हे देखील वाचा