Thursday, June 13, 2024

‘माझी बायको, माझे वेड आणि…’; पत्नीच्या वाढदिवसानिमित्त रितेशने केली ‘ती’ पोस्ट चर्चेत

वैवाहिक जीवन कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे बॉलिवूड कलाकार रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूझा होय. बॉलिवूडमधील हे लव्हबर्डस आपल्या प्रेमाच्या वेगवेगळ्या अंदाजाने सगळ्यांना त्यांच्या प्रेम कहाणीकडे आकर्षित करताना दिसतात. जिनिलिया नेहमीच त्या दोघांचे रोमँटिक व्हिडीओ आणि फोटो प्रेक्षकांमध्ये शेअर करत असते. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. जिनिलिया आणि रितेश एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात.

जिनिलिया (Genelia D’Souza) शनिवारी (5 ऑगस्ट) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसा निमित्त रितेशने (Riteish Deshmukh) एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने पोस्ट शेअर करताना लिहिले की, “माझ्या जिवलग मित्रीणीला, माझी कट्टर समर्थक, माझ्या प्रत्येक गुन्ह्यातील भागीदार, माझी सर्वात मोठी जीवनरेखा, माझे सर्व काही असणाऱ्या बायकोला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझे जीवन समृद्ध केल्याबद्दल धन्यवाद! माझी बायको. माझे वेड!! मी तुझ्यावर खूप प्रेम करतो.”

रितेशच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. त्याच्या या पोस्टवर कलाकारांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. सिद्धार्थ जाधवने कमेंट करत लिहिले की, ” वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी.” अमृत्ता खालविनकरने लिहिले की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा. अशीच गोंडस आणि हसत रहा.” तसेच अनेक मराठी कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तर अभिनेत्री रिया चक्रवर्तीने देखील शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, जिनिलिया  देशमुख तिचा 36वा वाढदिवस साजरा करत आहे. जिनिलियाचा जन्म 5 ऑगस्ट 1987 रोजी मुंबई (महाराष्ट्र) येथे झाला. ती एक यशस्वी आणि नावाजलेली अभिनेत्री आहे. जिनिलियाने वयाच्या 15 व्या वर्षी अभिनया जगात पदार्पण केला. अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांच्यासोबत पेनची जाहिरात करताना ती पहिल्यांदा खूप चर्चेत आली होती. 2003 मध्ये रिलीज झालेला ‘तुझे तेरी कसम’ हा जिनिलियाचा पहिला डेब्यू चित्रपट आहे. या चित्रपटातून तिच्यासोबत रितेश देशमुखनेही डेब्यू केला होता. (Riteish Deshmukh made a special post on the occasion of his wife Genelia D’Souza’s birthday)

अधिक वाचा- 
‘सैराट’फेम रिंकू राजगुरुने शेअर केला पहिल्यांदा नाटक पाहण्याचा अनुभव; म्हणाली, ‘असं नाटक…’
गोविंदाच्या अकाऊंटवरील हिंदूसंदर्भातील ‘त्या’ पोस्टवरुन वाद; अभिनेता म्हणाला, ’18 वर्षांपूर्वी राजकारण सोडले, परत…’

हे देखील वाचा