Wednesday, October 15, 2025
Home मराठी ‘भारतात १५ ऑगस्ट १९४७ नंतर महापुरुष जन्माला येणं का बंद झालंय? शरद पोंक्षेनी सांगितले कारण

‘भारतात १५ ऑगस्ट १९४७ नंतर महापुरुष जन्माला येणं का बंद झालंय? शरद पोंक्षेनी सांगितले कारण

मराठी सिनेसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता शरद पोंक्षे हे आपल्या अभिनयासोबतच परखड व्याख्यानांसाठी देखिल ओळखले जातात. अभिनेता सतत भारतातील महापुरुषांविषयी व्याख्यानं सांगत लोकांनाही त्यांच्या मार्गावर चालण्याचा संदेश देत असतात. सोशल मीडियवर सतत त्यांचे व्हिडिओ व्हायरल होत असतता. पुन्हा एकदा त्यांच्या व्यांख्यानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये त्यांनी 15 ऑगस्ट 1947 नंतर भारतात महापुरूष जन्माला येणं बंद झालंय असं सांगितलं आहे.

अभिनेता आणि प्रख्यात व्याख्यानकार शरद पोंक्षे यांनी अनेक चित्रपटामध्ये कौतुकास्पद भूमिका साकारल्या आहेत.  त्याशिवाय सोशल मीडियावर त्यांच अधिकृत युट्युब अकाउंट असून लाखो चाहते त्यांना फॉलो करतात. अशातच त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोंक्षे म्हणाले की, “15 ऑगस्ट 1947 सालापर्यंतचा इतिहास जर तुम्ही वाचलात, तर एक महापुरूष जन्माला येतो, तो संपेपर्यंत दुसऱ्या महापुरूषाला जन्माला घालतो. म्हणजे एक शंकराचार्य जन्माला आले, मग ज्ञानेश्वर माऊली जन्माला आली, मग रामदास स्वामी जन्माला आले, त्यानंतर तुकाराम महाराज जन्माला आले. त्याच काळात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. एक पेशवे जन्माला आले, तात्या टोपे जन्माला आले. झाशीच्या राणी जन्माला आल्या. त्यानंतर चाफेकर बंधू जन्माला आले, सावरकर जन्माला आले, टिळक जन्माला आले. जन्माला येतायत माणसं, जन्माला येतायत. अशातच 15 ऑगस्ट 1947आलं आणि माणसंच संपली ओ…”

 

View this post on Instagram

 

शरद पोंक्षे पुढे म्हणाले की, “आपला देश शेतीप्रधान का आहे, याचं फार महत्त्वाचं कारण हे आहे की, उगवलेल्या रोपट्याचे सर्वच दाणे बाजारात विकायला जात नाहीत. त्यातले काही दाणे जन्माला आल्यानंतर बाजारात जाऊन विकायला उभं राहण्याऐवजी स्वतःला त्याच जमिनीमध्ये पुन्हा गाडून घ्यायला तयार होतात. ते गाडून घ्यायला तयार होतात, म्हणून त्याच्यातून दुसरे दाणे निर्माण होतात. ही साखळी आहे आणि ही साखळी 15 ऑगस्ट 1947 ला संपली.”

 

View this post on Instagram

 

शरद पोंक्षे सतत देशातील नेत्यांविषयी पखड व्याख्यानं देत असतता. त्यांना कधी कधी त्यांच्या वक्तव्यामुळे ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. काही दिवसांपूर्वीच त्यांनी शिवाजी महाराज आणि  राजा छत्रसाल यांच्या मैत्रीबद्दल एका व्हिडिओत सांगितले होते की, शिवाजी महाराजांच वचन पुर्ण करण्यसाठी बाजीराव पेशव्यांनी राजा छत्रसाल यांची कशा पद्धतीने मदत केली होती. मात्र, पोक्षेंच्या या विधानामुळे त्यांना ट्रोलिंगचा समनाकारवा लागाल होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सतत ड्रेस सावरताना दिसली भोजपुरी स्टार आम्रपाली दुबे
हसरा चेहरा इतिहास गेहरा! गौरी नलावडेचा शाइनी लूक

हे देखील वाचा