भारतरत्न माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज जयंती सर्वत्र साजरी होत आहे. संपूर्ण देशाला त्याची उणीव भासत आहे. राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी झाला. 1991 मध्ये निवडणूक रॅलीत झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांची हत्या झाल्याने संपूर्ण देश हादरला होता. लिबरेशन टाइगर्स ऑफ़ तमिल ईलम (LLTE) या श्रीलंकेतील सशस्त्र तमिळ फुटीरतावादी संघटनेने त्यांची हत्या केली. त्यांची मुलगी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आपल्या वडिलांची आठवण करून भावनिक पोस्ट केली आहे.
प्रियंका गांधींनी (Priyanka Gandhi) एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये प्रसिद्ध अभिनेते राज कपूर यांच्या ‘अनारी’ चित्रपटातील गाण्याच्या ओळी लिहिताना राजीव गांधी हसताना दिसत आहेत. तसेच एक फोटो देखील त्यांनी शेअर केला आहे. हा फोटो बाॅलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी काढलेला आहे, असे सांगितले आहे.
प्रियंका गांधींनी पोस्ट करताना कॅप्शमध्ये हिंंदी चित्रपटातील गाणं लिहिले आहे. त्यांनी लिहिली की,“किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार , किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार जीना इसी का नाम है……जिन्दा है हमीं से नाम प्यार का, कि मर के भी किसी को याद आएंगे, किसी के आँसुओं में मुस्कुराएंगे, कहेगा फूल हर कली से बार बार, जीना इसी का नाम है।” ये लाइनें हमेशा आपकी याद दिलाती हैं और आज तक, जब भी ये गाना सुनती हूँ, मेरी आँखों में आँसू उभर आते हैं।”
View this post on Instagram
ही पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहते कमेंट करत आहेत. प्रियंका गांधी यांच्या या पोस्टवर कमेंट करत एका युजरने लिहीले की, “राजीव गांधी कायम लोकांच्या ह्रदयात राहतील.” माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज ७९ वी जयंती आहे. देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. (Sharing a photo taken by Amitabh Bachchan, Priyanka Gandhi paid tribute to Rajiv Gandhi in a song)
अधिक वाचा-
–तारा सिंगला मोठा दणका! सनी देओलच्या मुंबईतील बंगल्याचा होणार लिलाव? एकदा वाचाच
–‘पुष्पा’ फेम अभिनेत्रीने ढसाढसा रडत व्यक्त केले दु:ख; म्हणाली, ‘मी खंबीररित्या जगू शकत नाही..’