दक्षिनात्य सिनेसृष्टीत एकापेक्षा एक सुंदर अभिनेत्री आहेत. त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. पुष्पा चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री अनसूया भारद्वाजला सोशल मीडियावर सक्रिय असते. तिने त्या चित्रपटात काम करून खूप प्रसिद्धी मिळवली. अनसूया नियमितपणे काही ना काही पोस्ट करत रहते. तिच्या पोस्टवर अनेक लोक नकारात्मक प्रतिक्रिया देतात. तिला अनेकदा ट्रोल केले जाते. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अनसूया (Anasuya Bhardwajla) या व्हिडिओमध्ये रडताना दिसत आहे. तिने हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तिने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकांऊटवर शेअर केला आहे. तिने व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ” नमस्कार!! तुम्ही सर्वजण बरे असाल, अशी मी आशा व्यक्त करते. मला माहिती आहे की, जे कोणी माझी ही पोस्ट पाहत असतील, ते चिंतेत पडले असतील. आपण सोशल मीडियाद्वारे आपण जगभरातल्या लोकांबरोबर कनेक्ट राहू शकतो. याचा वापर करुन आपण एकमेकांच्या अडीआडचणी समजून घेऊ शकतो आणि आधारही देऊ शकतो. आपल्या मनातील चांगली किंवा वाईट कोणतीही गोष्टी शेअर करण्यासाठी याचा वापर केला जातो. एकमेकांची जीवनशैली, संस्कृतीही यातून समजू शकतो. तसेच आनंद आणि दु:खही आपल्याला वाटून घेता येते.
याच सोशल मीडियाचा वापर करुन मी माझ्या वाईट क्षणांबद्दल चाहत्यांना काही गोष्टी सांगत आहे. मी ज्याप्रकारे माझे फोटोशूट, आनंदाचे क्षण तुमच्याबरोबर शेअर करते, त्याचप्रकारे मला तुम्हाला काही गोष्टी शेअर करायच्या आहेत. माझ्या आयुष्याचे काही टप्पे खुप खडतड आहेत. ज्या ठिकाणी मी खंबीररित्या जीवन जगू शकत नाही. मी खूप कमजोर व्यक्ती आहे.
View this post on Instagram
पण मी एक सेलिब्रेटी असल्याने मला माझ्या भावनांबद्दल तटस्थपणे विचार करणे मला भाग पडते. मी कितीही खंबीर असल्याचे दाखवत असली तरी मी तशी नसून मी मनाने खूप खचली आहे. जेव्हा माझ्यातील सहनशील वृत्ती संपते तेव्हा मी स्वत:ला वेळ देण्यास पहिले प्राधान्य देते. मी खूप रडते . त्यानंतर एक-दोन दिवसांनी पुन्हा त्याच जोमाने काम कराल उभी राहते. #ItsOKtoBeNotOK हे देखील महत्त्वाचे आहे. विश्रांती घ्या. स्वत:ला पुन्हा एकदा रिबूट करा. पण धीर सोडू नका पुढे जात राहा.”
अनुसया विषयी बोलायच झाले तर, अनुसया 10-11 वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीचा एक भाग आहे. ती आधी अँकर आणि होस्ट होती. नंतर तिने फिल्मी दुनियेत प्रवेश केला. ‘पुष्पा 2: द रुल’, ‘भीष्म पर्व’, ‘F2: फन अँड फ्रस्ट्रेशन’, ‘यात्रा’ आणि ‘रंगस्थलम’ यांसारख्या अनेक चित्रपटात दिसली. (‘Pushpa’ fame actress Anasuya Bhardwajla expressed grief crying profusely, video went viral on social media)
अधिक वाचा-
–जाळ अन् धूर संगटच! दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या हॉट फोटोंवर चाहते फिदा
–नाद नाद नादच! रिलीजच्या 2 आठवड्यांनंतर सनी देओलच्या सिनेमाला यश; किती कोटी छापले वाचाच