Saturday, September 7, 2024
Home बॉलीवूड तारा सिंगला मोठा दणका! सनी देओलच्या मुंबईतील बंगल्याचा होणार लिलाव? एकदा वाचाच

तारा सिंगला मोठा दणका! सनी देओलच्या मुंबईतील बंगल्याचा होणार लिलाव? एकदा वाचाच

‘हमारा हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा’ प्रत्येक सच्चा भारतीय व्यक्ती सनी देओलवर या डायलॉगमुळे जीव ओवाळून टाकताना दिसत आहेत. सनीचा ‘गदर 2‘ चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला आहे. हा चित्रपट शनिवारी (11 ऑगस्ट) रिलीज झाला आहे. तेव्हा पासून सनी चांगलाच चर्चेत आला आहे. सनीचे लाखो चाहते आहेत. सनीने ‘गदर 2‘मध्ये दमदार कामगिरी करून भारतीयांच्या मनावर आधिराज्य केले आहे. पण आता सनीच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

एकीकडे यशाची चव चाखत असतानाच दुसरीकडे मालमत्ता लिलाव होण्याचं संकटही सनी (Sunny Deol) यांच्या डोक्यावर ओढवलं आहे. बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्या जुहू येथील बंगल्याचा लिलाव होऊ शकतो. या बंगल्याच्या लिलावाची ई-लिलाव अधिसूचना बँक ऑफ बडोदाने आजच्या वर्तमानपत्रांमध्ये जारी केली आहे. सनी देओलवर आरोप आहे की, त्याने बँकेकडून मोठ्या रकमेचे कर्ज घेतले होते, जे तो फेडू शकला नाही.

सनी देओलने कर्जासाठी मुंबईतील जुहू परिसरात असलेला सनी विला नावाचा बंगला कंपनीकडे तारण ठेवला आहे. सनीला सुमारे 56 कोटी रुपये बँकेत भरायचे होते, ते अद्याप त्याने दिलेले नाहीत. हे कर्ज आणि त्यावरील व्याज वसूल करण्यासाठी बँकेने बंगल्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.

Sunny Deol Bangla

जाहिरातीनुसार, सनी देओल, ज्याचे खरे नाव अजय सिंग आहे, तो कर्जदार आणि जामीनदार आहे आणि त्याने वर नमूद केलेली रक्कम बँकेला वेळेवर भरण्यात अयशस्वी झाल्याचा उल्लेखही नोटीसमध्ये करण्यात आला आहे. सनी विला या बंगल्याचा लिलाव 25 सप्टेंबर रोजी होणार आहे. लिलावासाठी मालमत्तेची रिझर्व्ह प्राईस 51.43 कोटी ठेवण्यात आली आहे, असे म्हटले आहे. माध्यमातील वृत्तानुसार, सनीचे हे घर जुहूमधील गांधी ग्राम रोडवर आहे, ज्याचे जामीनदार सनी देओलचे वडील धर्मेंद्र स्वत:आहेत. (Gadar 2 fame Sunny Deol bungalow in Mumbai will be auctioned)

अधिक वाचा- 
‘पुष्पा’ फेम अभिनेत्रीने ढसाढसा रडत व्यक्त केले दु:ख; म्हणाली, ‘मी खंबीररित्या जगू शकत नाही..’
जाळ अन् धूर संगटच! दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या हॉट फोटोंवर चाहते फिदा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा