Monday, July 1, 2024

बंगाल निवडणुकांसाठी शत्रुघ्न सिन्हा आणि बाबुल सुप्रियो यांचा उमेदवारी अर्ज दाखल

सध्या संपूर्ण देशामध्ये निवडणुकीचे वारे वाहताना दिसत आहे. वेगवेगळ्या राज्यातील लहान मोठ्या अनेक निवडणुका सध्या संपन्न होत आहे. राजकारण आणि मनोरंजनविश्व यांचा देखील खूपच जवळचा संबंध आहे. अनेक कलाकारांनी राजकारणात प्रवेश केला असून, ते या नवीन क्षेत्रातही यश मिळवताना दिसत आहे. लवकरच पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होणार आहे सध्या या निवडुकांची जोरदार तयारी झाली असून, या निवडणुकीसाठी दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी नुकताच उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे.

शत्रुघ्न सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) कडून उमेदवारीचा अर्ज भरला असून त्यांच्यासोबत प्रसिद्ध गायक बाबुल सुप्रियो यांनी देखील अर्ज दाखल केला आहे. टीएमसीने शत्रुघ्न सिन्हा यांना आसनसोल विभागातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केले आहे. तर बाबुल सुप्रियो यांनी बालीगंज येथून विधानसभेच्या उपचुनावसाठी नामांकन दाखल केले आहे. मुख्य म्हणजे शत्रुघ्न सिन्हा आणि बाबुल सुप्रियो हे दोघेही भाजपातून टीएमसीमध्ये दाखल झाले आहेत.

बालीगंज विधानसभा सीट नोव्हेंबर २०२१ मध्ये राज्य सरकारचे मंत्री सुब्रत मुखर्जी यांच्या निधनानंतर रिकामी झाली होती. तर आसनगोल लोकसभा क्षेत्र मधून निवडून आलेल्या बाबुल सुप्रियो यांनी भाजपाला सोडचिट्ठी दिल्याने इथे देखील पुन्हा निवडणुका होणार आहे. भाजपाने या निवडणुकांसाठी शत्रुघ्न सिन्हा यांच्याविरोधात फॅशन डिझायनर आणि राजनेता असलेले अग्निमित्र पॉल उभे आहेत. अग्निमित्र पॉल हे भाजपाचे महासचिव असून २०२१ सालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये ते आसनसोल इथून निवडून आले होते. बालीगंज इथून भाजपाने बाबुल सुप्रियो यांच्याविरोधात केया घोष यांना उभे केले आहे. या दोन्ही जागांच्या निवडणुकांचा निकाल १६ एप्रिल रोजी जाहीर होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा