Friday, March 29, 2024

अभिनेत्री पूजा सावंतचे स्वप्न झाले पूर्ण, ‘या’ गाण्यावर केला धमाकेदार डान्स परफॉर्मन्स

मराठी चित्रपट विश्वातील आपल्या अभिनयासाठी सतत नावाजल्या जाणाऱ्या अभिनेत्रींमध्ये अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) हिची गणना होते. ती सतत कोणत्या ना कोणत्या कामात स्वतः ला व्यस्त ठेवणे पसंत करते. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तिने आपला प्रचंड मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. पूजा सावंत सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. तिला सतत वेगवेगळ्या लूकमध्ये स्वतः ला तयार करून फोटोशूट करायला आवडते. नुकताच तिने तिचा एक व्हिडिओ शेअर करून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

पूजा सावंतने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामुळे अभिनेत्री आता चर्चेत आली आहे. या व्हिडिओमध्ये पूजा सावंत डान्स करताना दिसत आहे. ज्याच्या बॅकग्राउंडला ‘दिया जले’ हे गाणे वाजत आहे. या व्हिडिओत अभिनेत्री स्टेजवर परफॉर्मन्स करताना दिसत आहे. त्यावेळी अभिनेत्रीने काळ्या रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे. त्यासह सुंदर असा मेकअप आणि दागिने घालून अभिनेत्रीने तिचा लूक पूर्ण केला आहे.

व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीने एक खास कॅप्शन देखील दिले आहे. ज्यामध्ये तिने लिहिले की, “हे गाणे सादर करणे हे माझे लहानपणापासूनचे स्वप्न होते. झी महागौरवच्या निमित्ताने हे स्वप्न पूर्ण झाले , तमाम मराठी चित्रपट सृष्टीकडून गानसरस्वती लता मंगेशकर यांना मानवंदना देताना माझा छोटासा खारीचा वाटा झीमहागौरव २०२२ रविवार २७ मार्च संध्या ७ वाजता. @umeshjaadhav या संपूर्ण डान्सचे सुंदर नृत्यदिग्दर्शन केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. @abhijitrthakur३६९९ चे या अप्रतीम पोशाखासाठी खूप खूप धन्यवाद.” अभिनेत्रीच्या या पोस्टला आतापर्यंत २ लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत.

पूजा सावंतच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिने ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून २०१० मध्ये चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. या चित्रपटात तिने भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील, सोनाली कुलकर्णी या कलाकारांसोबत काम केले होते. तिने मराठी चित्रपटसृष्टीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत, ज्याला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम व प्रतिसाद दिला आहे. त्यानंतर तिने ‘दगडी चाळ’, ‘लपाछपी’, ‘झकास’, ‘नीलकंठ मास्टर’, ‘चिटर’, ‘वृंदावन’, ‘पोस्टर बॉईज’ ‘आता गं बया’, ‘झकास’, ‘सतरंगी रे’ ,‘दगडी चाळ’, ‘नीळकंठ मास्तर’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. पूजा सावंत तिच्या डान्समुळे देखील खूप लोकप्रिय आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा