Thursday, March 28, 2024

अभिनेता जिम सरभने चित्रपटातील भूमिकांबद्दल व्यक्त केल्या भावना म्हणाला, ‘आपले काम बोलते’

अभिनेता जिम सरभला(Jim Sarabh) गेल्या महिन्यांपासून दुहेरी आनंद साजरा करण्याची संधी मिळाली होती. कारण त्याच्या रॉकेट ब्वायज या वेब सिरीज मधील डॉ. होमी जहांगीर भाभा यांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते. त्याच बरोबर त्याने ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटात एका पत्रकाराची भूमिका साकारली होती या भूमिकेचेही सगळीकडे कौतुक झाले होते. या दोन्हीही व्यक्तिरेखा सत्य घटनेवर आधारित होत्या. याच भूमिकेबद्दल आता जिम सरभने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, जिम सरभने आपल्या या नवीन भूमिकांबद्दल मत व्यक्त केले आहे. यावेळी तो म्हणाला की, “याआधी ‘नीरजा’मधील खलिल असो किंवा ‘पद्मावत’ मधील मलिक कफूर. या सगळया भूमिका सत्य घटनेवर आधारित होत्या. अशा भूमिका साकारताना अनेक ठिकाणाहून माहिती घ्यावी लागते. आणि त्यानुसार आपल्या भूमिकेसाठी प्रयत्न करावे लागतात. आपण जास्तीत जास्त 50% अशा भूमिका कॅमेऱ्यात वठवू शकतो मात्र याच 50% भूमिका आपण किती उत्तम प्रकारे साकारतो हे पाहणे खूप महत्वाचे आहे. होमी भाभा हे माहितीचा खजिना होते. त्यामुळे त्यांची भूमिका साकारताना पडद्यावर मला कष्ट घ्यावे लागले. त्यासाठी मी खूप मेहनत घेतली सतत सराव केला त्यामुळेच या भूमिकेचे कौतुक होत आहे .”होमी भाभा यांची भूमिका साकारण्याआधी जिम सरभने त्यांनी वापरलेला एक बेंच खरेदी केला होता. याबद्दल बोलताना त्याने तो म्हणतो की” हा डेस्क खरेदी करण्यामागे त्यांची कला मला खूप आवडायची हेच कारण होते. मात्र आता ही भूमिका केल्यानंतर त्याबद्दल माझा आदर खूपच वाढला” असल्याचेही त्याने यावेळी सांगितले.

अभिनेता जिम सरभ चित्रपटाप्रमाणे वेबसीरिज आणि नाटकातही काम करताना दिसून येतो. या तीनही मंचावर त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. याबद्दल बोलताना तो म्हणतो की “चित्रपट आणि नाटक यामधील अभिनयात प्रचंड फरक असतो. रंगमंचावर अभिनय करताना लाइट असते मात्र कॅमेऱ्यासमोर काम करताना भूमिकानुसार काम करावे लागते.”  रॉकेट बॉईज’मध्ये मुख्य भूमिका साकारल्यानंतर मुख्य भूमिकेसाठी उत्सुकतेच्या प्रश्नावर जिम म्हणतो, “मी प्रत्येक प्रोजेक्टमध्ये माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो. जर मला त्याचा पुरस्कार मिळाला तर ते खूप चांगले आहे, जर ते कार्य करत नसेल तर काही फरक पडत नाही. मी केलेले काम स्वतःच बोलणार आहे. मी स्वतः पापाराझींना मुख्य भूमिकेसाठी किंवा बातम्यांमध्ये येण्यासाठी माझ्या घराबाहेर आमंत्रित करणार नाही. होय, माझे काम पाहून लोक आले तर चांगलेच आहे.”

बहुतांश गंभीर पात्रे साकारणारा जिम सेटवर त्या पात्राला सोडून जाण्यास प्राधान्य देतो. तो म्हणतो, ‘पात्र गंभीर असो वा सामान्य, मी रिहर्सलच्या वेळी त्या व्यक्तिरेखेत जातो आणि सीन करताना ते माझ्या व्यक्तिमत्त्वात समाविष्ठ करण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्ही तालीम चांगली केली असेल, तर तुम्ही तुमच्या पात्रात कधीही प्रवेश करू शकता आणि बाहेर पडू शकता. सीन संपल्यानंतर माझे कामही पूर्ण होते, त्यानंतर मी पुढे जातो. दरम्यान जीम सरभच्या अभिनयाचे आणि लूकचे असंख्य चाहते आपल्याला पाहायला मिळतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा