Monday, June 24, 2024

‘ट्रोल करणारी आर्मी मुद्दामच आहे’ म्हणत शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केले बॉयकॉट ट्रेंडवर त्यांचे मत

मागील काही काळापासून बॉलिवूडमध्ये ‘बॉयकॉट’चा मोठा ट्रेंड आला आहे. या ट्रेंडमुळे अनेक मोठ्या चित्रपटांना त्याचा तोटा सहन करावा लागला. याच ट्रेंडमुळे मोठे सिनेमे फ्लॉप झाले. अमीर खानच्या लालसिंग चड्ढापासून ते विजय देवरकोंडाचा लाइगर, अक्षय कुमारचा रक्षा बंधनपर्यंत आदी अनेक चित्रपट या ट्रेंडच्या लाटेमधे आले आणि फ्लॉप ठरले. शाहरुख खानच्या पठाण सिनेमाला देखील या ट्रेंडचा सामना करावा लागला. मात्र सुदैवाने हा सिनेमा हिट झाला. या बॉयकॉट ट्रेंडवर आजपर्यंत अनेक मोठ्या कलाकारांनी त्यांचे मत मांडले आता या ट्रेंडवर जेष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांचे मत मांडले आहे.

शत्रुघ्न सिन्हा यांनी या बॉयकॉट ट्रेंडवर भाष्य करताना स्पष्टपणे त्यांचे मत मांडले आहे. एका कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी सांगितले की, “ट्रोल करणाऱ्या लोकांनी फौज मुद्दामच बसवण्यात आली आहे. आजच्या काळात सोशल मीडिया हे खूपच प्रभावी आणि मोठे शक्तिशाली माध्यम बनले आहे. या माध्यमाच्या मार्गाने प्रत्येक व्यक्ती त्यांचे मत आणि विचार मांडू शकते, ऐकू शकते. मात्र दुर्दैवामुळे लोकं याच माध्यमाचा चुकीचा उपयोग करून घेत आहे. या माध्यमातून अनावश्यक पद्धतीचा त्रास दिला जात आहे.”

shatrughna sinha
Photo Courtesy: Instagram/shatrughansinhaofficial

पुढे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “सोशल मीडिया आजच्या काळात खूपच शक्तिशाली बनले आहे. कोरोनानंतर अनेक गोष्टी खूपच अवघड झाल्या आहेत. कोरोनाच्या काळात जी जागा निर्माण झाली, तिनेच या सोशल मीडिया माध्यमाला जास्त शक्तिशाली केले. लोकांना या माध्यमामुळे त्यांचा आवाज उठवण्याची संधी मिळाली. याच सोशल मीडियावर लोकं अनेक चुकीच्या गोष्टी देखील लिहितात. तुम्ही मी आपण इच्छा असूनही त्यांना थांबू शकत नाही. कारण आपल्याला माहीतच नाही की ती लोकं कोणती आहेत. ट्रोल करणारी आर्मी मुद्दामच बसलेली आहे. अनेकदा कमजोर चित्रपटांना घेऊन देखील एवढा मोठा वाद निर्माण केला जातो की, फ्लॉप होणार सिनेमा देखील हिट होतो. सोशल मीडिया आज अशा ठिकाणी आहे, जिथून आपण त्याला काढू शकत नाही आणि ठेऊ देखील शकत नाही.”

शत्रुघ्न सिन्हा आज जास्त चित्रपटात दिसते नसले तरी ते विविध कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसतात. शिवाय ते राजकारणात देखील सक्रिय आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हेमा मालिनीला धर्मेंद्रच्या पहिल्या पत्नीचा वाटताे हेवा? सिमी ग्रेवालच्या शोमध्ये अभिनेत्रीने केला खुलासा

राखी सावंतचा प्रेग्नेंसी अन् मिसकॅरेजवर धक्कादायक खुलासा; म्हणाली, ‘ऑपरेशननंतर आदिलने माझ्यासोबत…’

हे देखील वाचा