दोन बहिणींमधील नाते हे खूप जिव्हाळ्याचे असते. मनातील भावनापासून ते एकमेकींच्या वस्तूपर्यंत सर्वकाही त्या एकमेकींसोबत शेअर करत असतात. जर शेअर केलं नाही, तर त्यांच्यात भांडणं देखील होतात. फक्त सर्वसामान्यच नव्हे तर कलाकारांमध्ये देखील या गोष्टी होत असतात. नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडिओवरून असे लक्षात येते की, कलाकारांमध्ये देखील शेअरिंगवरून भांडणं होतात.
मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे या बहिणी तर तुम्हाला माहीतच असतील. ही मराठी इंडस्ट्रीमधील बहिणींची लाडकी आणि लोकप्रिय जोडी आहे. नुकताच मृण्मयीने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती मोठ्या बहिणीच्या व्यथा मांडताना दिसली आहे. शिवाय तिने गौतमीवर गंभीर आरोपही लावलेले पाहायला मिळाले.
या व्हिडिओमध्ये मृण्मयी सांगतेय की, “मी आता गौतमीच्या घरात आहे आणि मी तिचं कपाट लावत आहे. मला हे सांगताना आनंद होत आहे की, आतापर्यंतचे माझे हरवलेले सगळे कपडे मला मिळाले आहेत. माझ्या कपड्यांचे बोळे करून ते लपवण्यात आले होते. मी जेव्हा जेव्हा विचारले की, गौतु माझे टॉप चुकून तुझ्याकडे आले आहेत का? तेव्हा मला नाही ताई, नाही ताई असंच सरळ उत्तर देण्यात आलं आणि त्या कपाटात माझे सगळे कपडे लपून ठेवण्यात आले आहेत. तुम्ही ज्या सईवर प्रेम करता ती सई एक चोर आहे.” असे म्हणत मृण्मयीने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “अजूनही सुधारली नाहीये ही!!”
मृण्मयीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ती आता ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ या शोला होस्ट करत आहे. तसेच गौतमी आता ‘माझा होशील ना’ या मालिकेत सईची व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-