Monday, December 16, 2024
[aioseo_breadcrumbs]

“इतका राग होता ‘उच्चवर्णिय प्रस्थापितांवर’ तर मग मुख्य भूमिकेत अमिताभ कशाला?”, लेखिकेच्या पोस्टमुळे वाद

लोकप्रिय लेखिका आणि ब्लॉगर शेफाली वैद्य नेहमीच विविध गोष्टींवर त्यांचे मत व्यक्त करत असतात. यामुळे अनेकवेळा त्या वादाच्या भोवऱ्यात अडकतात. सोशल मीडियावर अनेकवेळा त्या त्यांचे मत व्यक्त करत असतात अशातच त्यांनी नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ या चित्रपटावर निशाणा साधला आहे. ज्यामुळे त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.

नागराज मंजुळे हे नेहमीच तळगळातील कलाकारांना एकत्र घेऊन काहीतरी नवीन प्रयोग करत असतात. यावेळी त्यांनी हा प्रयोग हिंदीमध्ये केला आहे. हिच त्यांच्या चित्रपटांची खासियत असते. समाजातील एखादा घटक ते समाजासमोरच मांडतात. या विषयाची मांडणी करताना ते कलाकार देखील नवखे घेऊन त्यांना संधी देतात. परंतू, हीच कहाणी रुपेरी पडद्यावर दाखवताना मंजुळे यांनी अमिताभ यांच्यासारख्या बड्या अभिनेत्याला का निवडले, असा प्रश्न शेफाली वैद्य यांच्या मनात आला आणि त्यांनी तशी पोस्टही केली.

यावर आता शेफाली वैद्य यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. जी सध्या जोरदार चर्चेत आहे. या पोस्टमुळे एक नवीन वाद उभा राहिल्याचे दिसत आहे. त्यांनी फेसबुकवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “इतका राग होता उच्चवर्णीय प्रस्थापितांवर मग मुख्य भूमिकेत अमिताभ कशाला?”

फेसबुक पोस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पोस्टवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यांचा हा विचार आणि प्रश्न अनेकांना पटला नाही. तसेच काहींनी मात्र नागराज यांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थितीत केले आहे. एका युजरने कमेंट करून करून लिहिले आहे की, “उच्चवर्णीय प्रस्थापित असा एक क्लब करू नका मॅडम ! सगळे प्रस्थापित उच्चवर्णीय नसतात, सगळे उच्चवर्णीय प्रस्थापितही नसतात. अमिताभच नाही, तर आमिर खान आणि धनुषही प्रस्थापितच आहेत, या लोकांना नागराजच्या कामाचे कौतुक करण्यात कमीपणा वाटत नाही. आणि मराठीपुरते बोलायचे तर नागराज स्वतःच सगळ्यात मोठा प्रस्थापित आहे आज. त्याच्या नावावर सिनेमे चालतात.”

फेसबुक पोस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या पोस्टवरून वाद चालू असताना काही वेळातच त्यांनी दुसरी पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “आग ऐसी लगाई की मजा आ गया! गान ऐकतेय मस्त आहे.” यावरून देखील त्यांना जोरदार ट्रोल केले जात आहे. एका युजरने कमेंट केली आहे की, “आग आपल्याला लागली की, दुसऱ्याला स्पष्ट करावे.” अशाप्रकारे त्यांचा हा वाद वाढतच चालला आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा