Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘सिद्धार्थ भाई देवाप्रमाणे तुझी पूजा करेन’, म्हणत शहनाझच्या भावाने केली भावुक पोस्ट शेअर

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने २ सप्टेंबर रोजी जगाचा निरोप घेतला. आता सिद्धार्थ फक्त आठवणींमध्ये आहे. त्याच्या मृत्यूनंतर, त्याचे चाहतेच नव्हे तर त्याचे मित्रही त्याची जुने फोटो आणि व्हिडिओंद्वारे आठवण काढत आहेत. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शहनाझ गिलचा भाऊ शहबाज पुन्हा एकदा भावुक झाला आहे. पुन्हा एकदा त्याने ‘सिड’ला ‘सिंह’ म्हटले आणि सिद्धार्थच्या फोटोसह एक भावनिक पोस्ट देखील शेअर केली. जे वाचल्यानंतर चाहते भावनिक तर झालेच, पण ते शहनाझबद्दल ही विचारत आहेत.

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाच्या बातमीने प्रत्येकाचे डोळे पाणावले आहेत. स्वतःला इतके तंदुरुस्त ठेवणाऱ्या सिडचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला यावर अजूनही कोणाचा विश्वास बसत नाही. सिद्धार्थच्या जवळचे लोकही त्याला विसरू शकत नाहीत. या जवळच्या मित्रांमध्ये शहनाझ गिलचा भाऊ शहबाजही आहे. शहबाजने पुन्हा एकदा आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर सिद्धार्थ शुक्लाचा फोटो शेअर केला आहे. त्याचसोबत एक भावनिक पोस्ट देखील शेअर केली आहे. ‘बिग बॉस १३’ च्या दरम्यान शहबाज आपल्या बहिणीला पाठिंबा देण्यासाठी घरात गेला होता, तेव्हाचा हा फोटो आहे. या फोटोत शहबाज आणि सिद्धार्थ दोघेही एकत्र बसलेले दिसत आहेत.

फोटो शेअर करत शहबाजने कॅप्शनमध्ये लिहिले की, “नजरेपासून दूर आहेस, पण हृदयाच्या खूप जवळ आहेस. आता सिद्धार्थ भाई देवाप्रमाणे तुझी पूजा करेन. आता हेच माझे नशीब आहे.” यासह, पुन्हा एकदा शहबाजने सिद्धार्थला इंस्टा स्टोरीमध्ये ‘सिंह’ म्हटले आहे.

शहबाज व्यतिरिक्त शहनाझ गिलचे वडील संतोख सिंग देखील सिद्धार्थ शुक्लाला खूप मिस करत आहेत. संतोख सिंग यांनी सोशल मीडियाद्वारे सिद्धार्थच्या आठवणीतील पोस्टही शेअर केली आहे. काही दिवसांपूर्वीच, संतोख सिंग यांनी त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटद्वारे सिद्धार्थ शुक्लासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसह त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “विश्वास बसत नाही, तू नेहमी माझ्या हृदयात राहील.”

सिद्धार्थच्या निधनाने सर्वांनाचं खूप मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर त्याची कथित गर्लफ्रेंड शहनाझ गिलला देखील खूप मोठा धक्का बसला आहे. ती अजूनही या धक्क्यातून स्वतःला सावरू शकली नाही. ती पूर्णपणे खचली आहे. प्रत्येकाला शहनाझची काळजी वाटत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ब्रेकिंग: दिग्गज अभिनेता अक्षय कुमारच्या आईने घेतला जगाचा निरोप, आज सकाळी झाले निधन

-‘हद्द झाली यार!’ सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर व्लॉग बनवणाऱ्या संभावना सेठवर भडकले नेटकरी

-तो किस्सा, जेव्हा ‘या’ कारणामुळे जान्हवी कपूरला चक्क गाडीच्या डिक्कीमध्ये लागले लपावे

हे देखील वाचा