×

जेव्हा बिग बॉसच्या मंचावर शहनाझ स्वतःला म्हणाली, ‘पंजाबची कॅटरिना’, पाहण्यासारखी होती सलमान खानची प्रतिक्रिया

अभिनेत्री शहनाझ गिलने तिच्या निरागस हास्याने आणि नटखट स्वभावाने सगळ्यांना तिच्या प्रेमात पडले आहे. असं म्हणतात की, आपल्यातील लहान मूल नेहमी जागं ठेवावं. तिचा हाच अंदाज आपण सर्वांनी ती बिग बॉसमध्ये असताना पाहिला आहे. परंतु तिच्या चाहत्यांनी जशी तिची ही निरागस आणि हसरी बाजू पाहिली आहे तसे तिच्या आयुष्यातील अत्यंत दुःखद काळ देखील पाहिला आहे. शहनाझ गुरुवारी (२७ जानेवारी) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त जाणून घेऊया तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टी…

शहनाझचा (shehnaaz gill) जन्म २७ जानेवारी १९९३ साली चंदिगढ येथे झाला. तिने तिच्या करिअरची सुरुवात २०१५ मध्ये एका म्युझिक व्हिडिओने केली होती. व्हिडिओचे नाव होते ‘शिव दी किताब.’ त्यानंतर शहनाज एका पंजाबी सिनेमांमध्ये दिसून आली. तिचा ‘सत श्रीअकाल इंग्लंड’ हा सिनेमा २०१७ साली आला होता. त्यानंतर ती ‘बिग बॉस १३’ मध्ये झळकली होती. तिथून खरी तिच्या लोकप्रियतेला सुरुवात झाली. या शोमधील तिच्या हटक्या अंदाजाने तिने सगळ्यांची मने जिंकून घेतली. (shehnaaz gill celebrate her birthday lets know about her life)

View this post on Instagram

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

सलमान खानने तिला पहिल्यांदा स्टेजवर ती बोलवले होते, तेव्हा तिच्या पंजाबी अंदाजाने तिने चाहत्यांची मने जिंकली होती. पहिल्याच भेटीत सलमानला ती म्हणाली की, “मला पंजाबची कॅटरिना कैफ म्हणतात.”  या वाक्यावर सलमान खान खूप हसला होता. त्यानंतर त्याने शहनाजला ‘क्यूट गर्ल’ असे म्हटले होते.

View this post on Instagram

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

सुरवातीला तिचे वजन जास्त होते. परंतु ती जाडी असल्याचे तिने स्वतः सलमान खानसमोर कबूल केले होते. बिग बॉसच्या घरात आल्यावर तिची सगळ्यांशीच छान मैत्री झाली होती. परंतु एका व्यक्तीशी मात्र तिची खास मैत्री झाली होती. ती म्हणजे सिद्धार्थ शुक्ला. बिग बॉसच्या घरात तिने सर्वात जास्त वेळ कोणासोबत घालवला असेल तर तो होता सिद्धार्थ शुक्ला. त्यांच्यातील मैत्री पाहून त्यांना चाहत्यांनी ‘सिडनाज’ हे नाव दिले होते. मैत्रीच्या थोड्या पलीकडचे आणि प्रेमाच्या थोड्या अलीकडचे असणारे त्यांचे हे नाते सगळ्यांना खूप आवडत होते.

View this post on Instagram

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

परंतु त्यांच्या मैत्रीला कोणाची दृष्ट लागली काय माहित? २०२१ मध्ये सिद्धार्थ शुक्लाने या जगाचा निरोप घेतला. त्या जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीला धक्का बसला. शहनाझ तर अगदी सदम्यात गेली होती. तिचे करिअर, भविष्य तिला काहीच दिसत नव्हते. आत कुठे जाऊन आपली ही पंजाबची कॅटरिना पूर्वपदावर आली आहे. आता कुठे ती धक्क्यातून सावरली आहे आणि तिच्या करिअरकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला लागली आहे. नुकतेच तिचे काही व्हिडिओ अल्बम देखील प्रदर्शित झाले आहेत. तसेच तिने सिद्धार्थच्या आठवणीत एक गाणे देखील केले आहे.

हेही वाचा :

Latest Post