Sunday, June 8, 2025
Home टेलिव्हिजन शेहनाजच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे वडीलांना धोका, अभिनेत्रीने स्वत:च केला धक्कादायक खुलासा

शेहनाजच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे वडीलांना धोका, अभिनेत्रीने स्वत:च केला धक्कादायक खुलासा

‘बिग बॉस’ फेम शेहनाज गिल (Shehnaaz gill) नेहमी कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिने बिग बॉस कार्यक्रमामधून अमाप प्रसिद्धी मिळवली आहे. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. सोशल मीडियावर शेहनाजचा मोठा चाहता वर्ग आहे. ती आपले फोटो आणि व्हिडिओद्वारे प्रेक्षकांचे लक्ष वेधत असते. तिच्या चाहत्यांना खूश ठेवण्याची एकही संधी ती सोडत नाही. मात्र, यावेळेस कारण जरा वेगळे आहे. शेहनाज बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तिचे लाखो चाहते झाले आहेत मात्र,हे तिच्यासाठी धक्कादायक ठरले आहे.

अभिनेत्री शेहनाज गिल बिग बॉसच्या घरातून बोहेर आल्यानंतर एक स्टार बनली आहे. सिद्धार्थ आणि शेहनाजच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले आहे. तिने आपल्या कॉमेडी अंदाजाने तिच्या चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. आता शेहनाज चित्रपटामध्ये देखिल झळकणार आहे. तिही आता एका सुपरस्टारपेक्षा कमी नाही. मात्र, शेहनाजचं प्रेक्षकांप्रती प्रेम शेहनाजसाठी धक्कादायक ठरत आहे. तिच्यासोबत अचानकच एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ती खूपच चर्चेत आली आहे.

माध्यमातील माहितीनुसार अभिनेत्रीचे वडील संतोक सिंह (Santokh Singh Sukh) सुख यांना विदेशी फोन नंबरवरुन काही व्यक्तींनी जीव घेण्याची धमकी दिली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने शिवीगाळ करुन घरामध्ये घुसुन मारुन टाकण्याची सांगितले आहे. माहितीनुसार संतोक यांनी पोलिस्टेशलमध्ये कंंपलेट दाखल केली आहे. मात्र , ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांना जिवे मारण्याची धमकी नाही, तर जिव घेण्याचाही प्रयत्न केला होता. शेबनाजचे वडील 2021 मध्ये भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये सहभागी झाले होते. यानंतर 25 डिसेंबर दिवशी दोन अनोळखी दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तींनी सेतोक यांच्यावर गोळीबार हल्ला केला होता, तेव्हा
अमृसरच्या या हल्ल्यामध्ये अभिनेत्रीचे वडील मरता मरता वाचले होते.

शेहनाज गिलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिने एका अल्बम सॉंगमध्ये काम केले आहे. तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. लाखो लोकांवर राज्य करणारी अभिनेत्री लवरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ती सलमान खानचा चित्रपट किसी का भाऊ किसी की जान या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यापूर्वी तिने पंजाबी चित्रपट हौसला मध्ये आपली कामगिरी बजवली आहे. लोकांनी तिच्या चित्रपटाला खूपच चांगली प्रतिक्रिया दिली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पाकिजा@४९: दिग्दर्शकाची पत्नीच अभिनेत्री, दोघांमधील वादामुळे १६वर्षे लांबला चित्रपट; शुटींग दरम्यान दारु पिऊन बेशुद्ध झालेली ‘मीनाकुमारी’
जेव्हा राजकुमार यांनी डान्स करताना उडवली होती गोविंदाची मस्करी, पुढे झाले असे की…

हे देखील वाचा