Wednesday, July 3, 2024

सिद्धार्थच्या निधनाने खूपच खचलीय शहनाझ; ना नीट जेवतेय, ना नीट झोपतेय; एकटीला सोडणे झालंय कठीण

टेलिव्हिजन अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे गुरुवारी (२ सप्टेंबर) हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. सिद्धार्थच्या निधनाने कुटुंबीयांसोबतच त्याच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. त्याचबरोबर सर्वात मोठा धक्का हा त्याची जवळची मैत्रीण शहनाझ गिलला बसला आहे. यामुळे शहनाझ पूर्णपणे खचली आहे. तिला यातून सावरणे खूप कठीण जात आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, शहनाझची प्रकृती अत्यंत वाईट आहे. ती इतकी खचली आहे की, तिला या धक्क्यातून सावरायला बराच वेळ लागेल. जेव्हापासून सिद्धार्थने जगाचा निरोप घेतला आहे, तेव्हापासून शहनाझ ना नीट जेवत आहे आणि ना ती नीट झोपू शकत आहे. याशिवाय ती कुणाशीही बोलत नाही. अशा परिस्थितीत शहनाझला एकटं सोडता येणार नाही. म्हणून सिद्धार्थची आई तिची काळजी घेत आहे आणि नेहमी तिच्यासोबत आहे.

शहनाझच्या मांडीवर झोपला होता सिद्धार्थ
माध्यमांतील वृत्तानुसार, सिद्धार्थ २ सप्टेंबरच्या रात्री १:३० वाजता शहनाझच्या मांडीवर डोके ठेवून झोपला होता. जेव्हा शहनाझ सकाळी ७ वाजता उठली, तेव्हा तिने पाहिले की सिड त्याच स्थितीत झोपला आहे आणि त्याच्या शरीराची कोणतीही हालचाल नाही. शहनाझने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो उठला नाही. हे पाहून शहनाझने त्याच्या कुटुंबीयांना बोलावून मदतीची मागणी केली. सिद्धार्थच्या बहिणीने आणि भाऊजीने त्याला कूपर रुग्णालयात नेले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

लग्नाचे केले होते प्लॅनिंग
शहनाझ गिल आणि सिद्धार्थ शुक्लाची ऑनस्क्रीन जोडी लोकांना खूप आवडली, पण शहनाझ ही खऱ्या आयुष्यातही सिद्धार्थवर प्रेम करायची. शहनाझ आणि सिद्धार्थ यांची पहिली भेट ‘बिग बॉस १३’ मध्ये झाली होती. या शोमध्ये शहनाझने खुलेपणाने सिद्धार्थबद्दल आपले प्रेम व्यक्त केले होते. माध्यमांतील वृत्तानुसार, शहनाझ आणि सिद्धार्थ डिसेंबर २०२१ मध्ये लग्न करण्याचा विचार करत होते.

‘शहनाझ-सिडचे नाते पती-पत्नीपेक्षा जास्त होते’
सिद्धार्थची मैत्रीण पवित्रा पुनिया काही दिवसांपूर्वी म्हणाली होती की, “आज जेव्हा मी शहनाझला पाहते, तेव्हा माझा आत्मा थरथरतो. मी असे म्हणणार नाही की, दोघांचे बंधन मैत्री किंवा बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड होते. हे नाते पती- पत्नीपेक्षा कमी नव्हते. सोनी- महिवाल, रोमियो-ज्युलियट नंतर लोकांना सिद्धार्थ- शहनाझची आठवण येईल. त्यांचे चाहते त्यांच्यासाठी वेड झाले आहेत. मला शहनाझ आणि सिडची जोडी खूप आवडत होती. मला आशा आहे की, शहनाझ या धक्क्यातून लवकरात लवकर स्वतःला सावरेल. ती पराभवावर मात करण्यासाठी खंबीर होईल.”

सिद्धार्थ शेवटचा ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये दिसला
सिद्धार्थचे २ सप्टेंबर रोजी वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी मुंबई येथे निधन झाले. त्याच्या कुटुंबात त्याची आई आणि दोन बहिणी आहेत. माध्यमांतील वृत्तानुसार, सिद्धार्थच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका आहे. परंतु पोलिसांनी अजूनही मृत्यूच्या कारणाची पुष्टी केलेली नाही. सिद्धार्थ शेवटच्या वेळी ‘बिग बॉस ओटीटी’ मध्ये आणि ‘डान्स दीवाने’ या शोमध्ये दिसला होता, तेव्हाही शहनाझ त्याच्यासोबत होती. या दोघांनी एकत्र डान्स देखील केला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कुरकुरीत पकोडे पाहून शिल्पाच्या तोंडाला सुटले पाणी, एकटीनेच केले फस्त; थ्रोबॅक व्हिडिओ भन्नाट व्हायरल

-सुपरस्टार नागार्जुन यांची सून समंथाने फ्लॉन्ट केले ऍब्ज; पाहून तुम्हीही घालाल तोंडात बोटे

-‘हद्द झाली यार!’ सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर व्लॉग बनवणाऱ्या संभावना सेठवर भडकले नेटकरी

हे देखील वाचा