भावुक करणारा क्षण! सिद्धार्थच्या अंत्यसंस्कारावेळी जमिनीवर कोसळली शहनाझ; रडून रडून झाली बेजार

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे गुरुवारी (२ सप्टेंबर) निधन झाले. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर टीव्ही इंडस्ट्री आणि बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. सिद्धार्थची अचानक झालेल्या एक्झिटमुळे प्रत्येकालाच शॉक बसला आहे. सिद्धार्थच्या पार्थिवावर शुक्रवारी (३ सप्टेंबर) अंतिम संस्कार करण्यात आले. तसेच त्याचे मित्र आणि कुटुंबीय त्याच्या अंतिम दर्शनासाठी पोहोचले होते. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर त्याची कथित गर्लफ्रेंड शहनाझ गिलची प्रकृती अत्यंत वाईट आहे. ती खूपच खचली आहे. तिची मानसिक तसेच शारीरिक स्थिती खालावली आहे.

सिद्धार्थच्या अंतिम दर्शनासाठी शहनाझ स्मशानभूमीत गेली होती. ती तिच्या भावासोबत तिथे पोहोचली होती. शहनाझचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात ती रडताना दिसत आहे. सिद्धार्थ गेल्यानंतर ती पूर्णपणे दुखावली गेली आहे. सिद्धार्थच्या अंतिम संस्काराच्या वेळी शहनाझ जमिनीवर पडली आणि जमिनीवर बसून खूप रडत होती. अंतिम संस्काराच्या वेळीचे शहनाझचे अनेक फोटो समोर आले आहेत, ज्यात ती जमिनीवर बसून रडताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Bollywood Buzz (@cricbollybuzz)

शहनाझ सिद्धार्थच्या शेवटच्या भेटीसाठी स्मशानभूमीत आली होती. त्यावेळीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ती सिद्धार्थला पाहण्यासाठी रुग्णवाहिकेच्या दिशेने ओरडत येते. सिद्धार्थचा मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवण्यात आला होता. टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांनी सांगितले की, “शहनाझची अवस्था वाईट आहे. तिची प्रकृती चांगली नाही. ती खूप रडत आहे.”

शहनाझ आणि सिद्धार्थची ‘बिग बॉस १३’मध्ये भेट झाली होती. दोघेही शोमध्येच खूप चांगले मित्र बनले होते आणि दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली होती. या शोमध्ये दोघांची जोडी खूप प्रसिद्ध झाली होती. शो दरम्यान ‘सिडनाझ’ प्रचंड प्रसिद्धीच्या झोतात आले होते.

View this post on Instagram

A post shared by SidSanaMeriJaan???? (@sidnaazmerijaanforeveralways)

‘बिग बॉस’नंतरही दोघांनी अनेक प्रोजेक्ट्समध्ये एकत्र काम केले. म्युझिक व्हिडिओमध्ये दोघे एकत्र दिसले होते. अलीकडेच, सिद्धार्थ आणि शहनाझ ‘बिग बॉस ओटीटी’ आणि डान्स रियॅलिटी शो ‘डान्स दीवाने ३’ मध्ये एकत्र दिसले होते. तिथे दोघांनी सगळ्यांसोबत खूप मजा केली.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सिद्धार्थच्या अंतिम दर्शनाला पोहचली संभावना, ‘या’ कारणामुळे पोलिसांनी लगावली तिच्या पतीच्या कानशिलात

-‘सिडनाझ’च्या चाहतीला सहन झालं नाही सिद्धार्थच्या मृत्यूचं दुःख, बातमी ऐकताच बाथरूममध्ये पडली बेशुद्ध

-प्रसिद्ध दिग्दर्शकाने बॉलिवूडचं काळं सत्य आणलं बाहेर; म्हणाले, ‘इथं एवढं जोरात मारलं जातं की…’

Latest Post