Tuesday, June 6, 2023

शहनाज गिलच्या साध्या, सोज्वळ लूकने चुकवला चाहत्यांच्या काळजाचा ठोका, फोटो होतायेत तुफान व्हायरल

टेलिव्हिजनवरील सर्वात चर्चित अभिनेत्री म्हणून शहनाज गिलचे (Shehnaaz Gill) नाव घेतले जाते. बिग बॉसमधील सहभागापासून शेहनाज गिलचे नाव चांगलेच चर्चेत आले होते. या कार्यक्रमात शेहनाज आणि सिद्धार्थ शुक्लाच्या मैत्रीची सर्वात जास्त चर्चा झाली होती. तेव्हापासून शहनाज तिच्या अभिनयासाठी आणि सोशल मीडिया पोस्टसाठी नेहमीच चर्चेत असते. आपल्या सोशल मीडियावर ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते ज्यावर तिच्या चाहत्यांच्या जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळतात. सध्या शहनाजच्या अशाच फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे. ज्यामध्ये तिच्या सोज्वळ लूकने चाहत्यांना चांगलेच मोहित केले आहे. 

शहनाज गिलही सध्या सर्वत्र चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. बिग बॉस 13 चा भाग असलेली शहनाज घराघरात लोकप्रिय झाली आहे. शहनाज लवकरच सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटामुळे शहनाज सध्या चांगलीच चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याआधी शहनाजच्या इंस्टाग्राम पोस्टवर सगळ्यांच्याच नजरा खिळल्या आहेत. ज्यामध्ये ती पांढऱ्या सुटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.तिचा जवळचा मित्र सिद्धार्थ शुक्ला यांचे निधन झाल्यानंतर शहनाज गिल ब्रह्मा कुमारी संस्थानचा सदस्य बनली आहे. ब्रह्माकुमारी समाजातील अनेक उत्सवांमध्ये शहनाज अनेकदा दिसते.

नुकतीच ती ब्रह्माकुमारी हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी मुंबईत आली होती. व्हिडिओमध्ये शहनाज लाल रिबन कापतानाही दिसत आहे. खास दिवसासाठी शहनाजने पांढऱ्या रंगाचा सूट घातला होता, ज्यामध्ये ती खूपच मनमोहक आणि सुंदर दिसत होती. पोशाख कोणताही असो, पण तिच्यावर सगळेच खुलून दिसते. पांढऱ्या सूटमधील हे तिचे फोटो तिने इंस्टाग्रामवरही पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये शहनाजची लाजाळू आणि सुंदर स्टाईल पाहायला मिळत आहे. दरम्यान बिग बॉस 13 मध्ये, शहनाजने केवळ तिच्या क्यूटनेस आणि निरागसतेने चाहत्यांनाच नाही तर शोचा होस्ट सलमान खानचे देखील मन जिंकले होते. शहनाजची स्टाईल पाहून सलमान खानने तर शो संपल्यानंतर ती खूप पुढे जाणार आहे असे सांगितले होते. त्याचा अंदाज खरा ठरवत सलमान खानने त्याच्या आगामी चित्रपटात संधी दिली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा