Tuesday, June 6, 2023

हरवली असल्याचे पोस्टर झळकल्यानंतर पुन्हा एकदा मतदार संघात दिसली नुसरत जहॉं, महाप्रसाद तयार करतानाचे फोटो व्हायरल

पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक लढवून निवडून आलेली अभिनेत्री नुसरत जहॉंच्या(Nusarat Jahan) मतदार संघात काही दिवसांपूर्वी हरवल्या असल्याचे पोस्टर लावण्यात आले होते. ज्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. त्यानंतर आता नुसरत जहॉं पुन्हा एकदा आपल्या मतदार संघात सक्रिय झाली आहे. अलिकडेच तिने मोदी सरकारवर टिका केली होती ज्यामुळे चांगलीच चर्चा रंगली होती. त्याचबरोबर नुकतीच तिने गोबिंदपुर मध्ये भद्र कालीच्या महाप्रसादही तयार करताना दिसत होते. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

अभिनेत्री नुसरत जहॉं नेहमीच विविध कारणांनी सोशल मीडियावर चर्चेत येत असते. काही दिवसांपूर्वी तिच्या मतदार संघात नुसरत जहॉं हरवल्याचे पोस्टर लावण्यात आले होते. ज्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. पण या पोस्टरचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळत असून नुसरत पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाली आहे. काही दिवसांपूर्वी तिने मोदी सरकारवर टिकाही केली होती. त्याचबरोबर आता नुसरत जहॉंचे महाप्रसाद बनवतानाचे  फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या कार्यक्रमात बोलताना नुसरत जहॉंने “मला इथे येऊन खूप आनंद झाला आहे. कार्यक्रम खूपच छान सुरू आहे. कार्यक्रमात हिंदु आणि मुस्लिम सगळेच एकत्रित उत्सव साजरा करत आहेत. ही सर्वात मोठी बाब आहे. सोबतच यामुळे एक चांगला संदेशही दिला जातोय,”असे मत व्यक्त केले आहे. या कार्यक्रमामुळे नुसरत जहॉं पुन्हा एकदा तिच्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना दिसत आहे. याआधी ती पती निखील जैनमुळे आणि त्यानंतर बाळाला जन्म दिल्यानंतर ती चांगलीच चर्चेत आली होती. राजकारणाव्यतिरिक्त नुसरत सोशल मीडियावरही चांगलीच चर्चेत असते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा