हॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय ‘लुसिफर’ सिरीजमध्ये शेहनाज गिलची एन्ट्री? पोस्टर पाहून गोंधळात पडले नेटकरी


शेहनाज गिल तर तुम्हा सर्वांना आठवतच असेल. बिग बॉसनंतर सिद्धार्थ शुक्ला आणि शेहनाज गिल ही दोन नाव सगळ्यांच्याच तोंडावर सतत यायला लागली. सिद्धार्थच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर शेहनाज काही काळ सर्वांपासुनच दूर गेली होती. मात्र आता ती हळूहळू तिच्या दैनंदिन जीवनावर परतत असून, अनेकदा तिला मीडियाच्या कॅमेऱ्यांमध्ये देखील स्पॉट केले जाते. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या शेहनाजने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला हा फोटो पाहून नेटकऱ्यांचा मात्र चांगलाच गोंधळ उडाला असून, त्यावर आता अनेक प्रश्न विचारण्यात येत आहेत.

शेहनाजने लोकप्रिय हॉलिवूड वेबसेरीज ‘लुसिफर’चे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये शेहनाज लुसिफर’चे मुख्य अभिनेते असलेल्या टॉम एलिससोबत दिसत आहे. हे पोस्टर आणि यासोबत दिलेले कॅप्शन सर्वानाच गोंधळात टाकत आहे. या पोस्टरवर लिहिले आहे की, “हेलला नवीन हाऊसमेट मिळाली आहे.” तर या पॉटरसोबत शेहनाजने लिहिले की, “पण खरा बिग बॉस तर इथे आहे. या सोबतच तिने #NetflixIndiaPlayback2021 #Playback2021’ हे हॅशटॅग देखील दिले आहेत.

हा फोटो नीट पाहिला तर हा खराच फोटो आहे. फोटोशॉप केलेला अजिबात वाटत नाही. शिवाय शेहनाज आणि टॉम यांचे हे पोस्टर एकदम परफेक्ट दिसत आहे. ही पोस्ट पाहून काहींना वाटत आहे की, शेहनाज ‘लुसिफर’ सिरीजमध्ये दिसणार आहे तर, काहींनी लिहिले आहे की, ती बिग बॉसमध्ये एन्ट्री घेणार आहे. तर अनेकांनी लिहिले आहे की, ‘सिरीजचे प्रमोशन आहे’, एक काही म्हणतात, “डबिंग केले आहे’ आता या पोस्टर आणि पोस्ट मागची खरी माहिती तर शेहनाजच सांगू शकते तोपर्यंत नेटकऱ्यांनी अंदाज बांधावा आणि नक्कीच काय असेल याचा विचार करावा.

शेहनाज आणि सिद्धार्थ यांच्या मैत्रीच्या खूपच चर्चा बिग बॉसनंतर रंगल्या. सिद्धार्थच्या निधनानंतर शेहनाज तुटली होती. मात्र वेळेनुसार तिने स्वतःला सावरले आणि आता पुन्हा तिच्या कामावर परतली आहे.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!