Saturday, November 23, 2024
Home टेलिव्हिजन चप्पल घालून नारळ फोडल्याने ट्रोल झाली शहनाज गिल, ‘नाटकी आहेस’ म्हणत नेटकऱ्यांनी साधला निशाणा

चप्पल घालून नारळ फोडल्याने ट्रोल झाली शहनाज गिल, ‘नाटकी आहेस’ म्हणत नेटकऱ्यांनी साधला निशाणा

पंजाबची कॅटरिना कैफ म्हणून ओळखली जाणारी शहनाज गिल (Shehnaaz Gill) नेहमीच चर्चेत असते. कधी तिच्या सौंदर्यामुळे तर कधी तिच्या क्यूट स्टाइलमुळे ती नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत येत असते. आपल्या बोल्ड लूकने आणि फोटोंनी ती चाहत्यांंना नेहमीच घायाळ करत असते. पण अलिकडेच एका कार्यक्रमात शहनाजला चप्पल घालून नारळ फोडल्यामुळे नेटकऱ्यांच्या रोशाला सामोरे जावे लागले आहे. इतकेच नव्हेतर अनेकांनी शहनाजला नाटकी आहे म्हणत ट्रोल केले आहे. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ.

अभिनेत्री शहनाज गिल बिगबॉस कार्यक्रमापासून चांगलीच चर्चेत आली आहे. या कार्यक्रमाने तिला घराघरात लोकप्रियता मिळवून दिली. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असलेल्या शहनाजच्या फोटो आणि व्हिडिओवर तिचे चाहते नेहमीच कौतुक करत असतात. पण सध्या एका कार्यक्रमातील तिच्या कृतीमुळे शहनाज नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. शहनाज गिल रविवारी मुंबईतील ब्रह्माकुमारी हॉस्पिटलच्या नवीन ऑपरेशन थिएटरच्या उद्घाटनासाठी पोहोचली होती. यावेळी शहनाज गिल पांढऱ्या रंगाच्या सूटमध्ये खूपच सुंदर दिसत होती. शहनाजचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिच्या सौंदर्याने खूपच मोहित झाले होते. पण काही लोकांनी जे शहनाज गिलला चप्पल घालून नारळ फोडल्याबद्दल ट्रोल करत आहेत.

नवीन ऑपरेशन थिएटरच्या उद्घाटनावेळी शहनाज गिलला नारळ फोडावा लागला. यावेळी तिने चप्पल घातली होती. शहनाजने चप्पल घालताना नारळ फोडला. त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळेच नेटकऱ्यांनी शहनाजला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. व्हिडिओमध्ये शहनाज नेहमीप्रमाणे तिच्या बबली स्वभावात मस्ती करताना दिसत आहे. पण शहनाजची ही स्टाईल लोकांना आवडली नाही.

यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देताना “चप्पल घालून नारळ फेकत आहे. एवढं नाटक कशाला? नारळ कसा फोडायचा हे माहित नाही” असे म्हणत जोरदार ट्रोल केले आहे. तर आणखी एकाने “मॅडम फॅशनच्या जगात या चप्पल काढायल्या विसरल्या,” असे म्हणत शहनाजला ट्रोल केले आहे. अनेकांनी याबद्दल शहनाजला हिंदूंच्या भावना दुखावल्याचेही म्हणले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

author avatar
Chinmay Remane

हे देखील वाचा