Thursday, March 28, 2024

World No Tobacco Day | गुरू दत्त ते दिव्या भारतीपर्यंत, व्यसनाने ‘या’ कलाकरांचा कमी वयातच घेतला जीव

धूम्रपान किंवा तंबाखू हा एक असा विषय आहे, ज्याबद्दल आजपासून नव्हे तर अनेक वर्षांपासून जनजागृती केली जात आहे. तंबाखूचा दररोज वापर शरीराला स्लो पॉयझनकडे ढकलतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, तंबाखूच्या सेवनामुळे दरवर्षी सुमारे ८ दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. यंदाच्या जागतिक तंबाखू दिनाची थीम ‘पर्यावरणाचे रक्षण करा’ अशी आहे. बॉलिवूड देखील धूम्रपानाच्या हानिकारक प्रभावांबद्दल जागरूकता पसरवते. प्रत्येक चित्रपट सुरू होण्यापूर्वी धूम्रपानाचा इशारा दिला जातो. याशिवाय, चित्रपटांमधील धूम्रपानाचे कोणतेही दृश्य खाली असलेल्या डिस्क्लेमर बॉक्समध्ये सूचित केले जाते. दुसरीकडे बॉलिवूडमध्येही असे अनेक कलाकार आहेत, जे भरपूर स्मोकिंग करायचे. याच कारणामुळे त्यांनी लहान वयातच जगाचा निरोप घेतला. आज आम्ही तुम्हाला अशाच कलाकारांबद्दल सांगणार आहोत.

गुरू दत्त (Guru Dutt)
गुरू दत्त यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. पण त्यांचे वैयक्तिक आयुष्य खूप वेदनादायी होते. प्रेमात अनेकवेळा फसवणूक झाल्यानंतर अभिनेता आणि दिग्दर्शकाने दारू, सिगारेट आणि झोपेच्या गोळ्या घेण्यास सुरुवात केली. अंमली पदार्थांचे त्यांना इतके व्यसन लागले होते की, त्यांनी वयाच्या ३९व्या वर्षी आत्महत्या केली. (world no tobacco day 2022 indian celebrities who died from drug tobacco addiction)

सिल्क स्मिता (Silk Smita)
इंडस्ट्रीची मोस्ट कॉन्ट्रोव्हर्शियल अभिनेत्री सिल्क स्मिता खूप बोल्ड अभिनेत्री होती. तिच्या बोल्ड पात्रांमुळे तिला सॉफ्ट ऍडल्ट फिल्म्सची अभिनेत्री देखील म्हटले जायचे. स्टारडमच्या उंचीवर पोहोचल्यानंतरही अभिनेत्रीला खूप एकटे वाटायचे. अशा स्थितीत तिला ड्रग्ज आणि दारूचे व्यसन लागले. २३ सप्टेंबर १९९६ रोजी सिल्क स्मिताचा मृतदेह तिच्याच घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. तिचा मृत्यू आजही गूढ आहे.

श्रीदेवी (Sridevi)
बॉलिवूडची ‘चांदनी’ने २४ फेब्रुवारी २०१८ रोजी जगाचा निरोप घेतला. बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचे पोस्टमॉर्टम अहवालात म्हटले आहे. मात्र, अहवालात त्याच्या शरीरात दारूही आढळून आली. असे सांगण्यात येते की, नशेच्या अवस्थेत त्यांचा पाय घसरला आणि त्या बाथटबमध्ये पडल्या.

दिव्या भारती (Divya Bharti)
दिव्या भारती ही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. रिपोर्ट्सनुसार, तिने वयाच्या १९व्या वर्षीच दारू पिण्यास सुरुवात केली होती. अभिनेत्रीबद्दल असे म्हटले जाते की, ज्या दिवशी तिचा मृत्यू झाला, त्या दिवशी तिने खूप दारू प्यायली होती. त्यामुळे तोल बिघडला आणि ती बाल्कनीतून खाली पडली.

संजीव कुमार (Sanjeev Kumar)
संजीव कुमार यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे मानले जाते. तेही दारूच्या नशेत असायचे, असे सांगितले जाते. अभिनेत्याचे आयुष्यभर लग्न झाले नाही आणि वयाच्या अवघ्या ४७व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा