Monday, July 1, 2024

शिल्पा शेट्टीच्या शोमध्ये सिद्धार्थच्या आठवणी सांगताना भावुक झाली शेहनाज म्हणाली, त्याला नेहमी वाटायचे की…

दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) आणि शहनाज गिल (Shehnaz gill) यांच्या मैत्रीच्या नात्याची चर्चा अनेकदा होत असते, बिगबॉस १३ मध्ये झालेली दोघांची घट्ट मैत्री नेहमीच वेगवेगळ्या
कार्यक्रमात दिसून आली. कधी भांडणे तर कधी मस्ती करत दोघांनी आपल्या निखळ मैत्रीच्या अनेक आठवणी दिल्या मात्र त्यांचे हे गोड, प्रेमळ नाते विधात्याला मान्य नव्हते त्यामुळेच अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा आकस्मिक मृत्यू झाला. आपल्या जिवलग मित्राच्या जाण्याने शहनाजवर दुःखाचा डोंगर कोसळला होता, त्याच्याबद्दलच्या अनेक आठवणी ती अनेकदा सांगताना दिसते. अलिकडेच शिल्पा शेट्टीच्या शेप ऑफ यू कार्यक्रमात आलेल्या शहनाजने सिद्धार्थची अशीच एक आठवण बोलून दाखवली ज्यामुळे सगळेच भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने ‘शेप ऑफ यु’ नावाचा नवीन कार्यक्रम सुरू केला आहे, ज्यामध्ये ती चित्रपट जगतातील दिग्गज कलाकारांना बोलावत असते आणि त्यांच्या फिटनेसबद्दल तसेच आयुष्यातील अनेक रंजक गोष्टींबद्दल माहिती घेत असते. या कार्यक्रमाचा प्रोमो सध्या समोर आला असून यामध्ये जॉन अब्राहम, जॅकलीन फर्नांडिस, शमिता शेट्टी, शहनाज गिल असे दिग्गज कलाकार सहभागी होणार असून, या सगळ्यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेताना हा कार्यक्रम चांगलाच रंगतदार होणार असल्याचे दिसत आहे. या कार्यक्रमात सगळ्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक रंजक आणि मजेशीर किस्से सांगितले, मात्र अभिनेत्री शहनाज गिलने सांगितलेल्या सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीने सगळ्यांनाच भावूक केले.

यावेळी शिल्पा शेट्टी शहनाजला ठुमके लावायला सांगते यावर “आम्ही ठुमके लावणार नाही तर ही फिगर काय कामाची” असे म्हणते यावर शिल्पा शेट्टीसह सगळेच हसायला लागतात. यावर बोलता बोलता शहनाज “सिद्धार्थला मला नेहमीच हसताना बघायचे होते” असे म्हणते यावर सगळेच भावनिक होतात. तिच्या या बोलण्याने ती आजही सिद्धार्थला किती मिस करते हेच दिसून येते. सिद्धार्थ शुक्लाचा २ सप्टेंबर २०२० मध्ये मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूने शहनाजला मोठा धक्का बसला होता. आजही अनेकदा ती त्याच्या आठवणी सांगताना दिसत असते.

हे देखील वाचा