Wednesday, July 3, 2024

‘बदन पे सितारे’ गाण्यावर शिल्पाचा जोरदार डान्स, बहीण शमिता सोबत थिरकली शिल्पा, पहा डान्सचा व्हिडिओ

बॉलिवूडची सर्वात फिट अभिनेत्री म्हणून शिल्पा शेट्टी ओळखली जाते. शिल्पाच्या फिटनेससोबत तिच्या डान्सच्या देखील अनेक चर्चा होत असतात. शिल्पा सोशल मीडियावर मोठ्या स्वरूपात सक्रिय असते. ती नेहमीच तिचे तिच्या कुटुंबासोबतचे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सर्वानाच माहित आहे की, शिल्पा आणि शमिता या दोन्ही बहिणी एकमेकींसोबत खूप जास्त खास नाते शेयर करतात. याच खास नात्याचा एक सुंदर व्हिडिओ शमिताने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

शमिताने तिचा आणि शिल्पा शेट्टीचा एक डान्स करतानाच व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात या दोघी शमी कपूर यांच्या ‘बदन पे सितारे’ या गाण्यावर जोरदार कपल डान्स करत आहे. या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून या दोघींच्या डान्सला त्यांच्या फॅन्सकडून खूप लाईक्स मिळत आहे. हा व्हिडिओ शेयर करताना शमिताने शिल्पाला तिची फेव्हरेट डान्स पार्टनर म्हणून देखील सांगितले आहे.

या व्हिडिओमध्ये या दोघी बहिणी खूप मस्त करताना दिसत आहे. शिल्पाने गुलाबी रंगाचा तर शमिताने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. शिल्पा तिच्या संपूर्ण परिवारासोबत ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी गोव्याला गेली होती. तिथेच त्यांचा हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. या सुट्ट्यांचे शिल्पा आणि तिच्या परिवाराने अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते. शिल्पाने गोव्यात अनेक दिवस तिच्या सुट्ट्यांचा आनंद घेतला. या सुट्यांच्या एका व्हिडिओमध्ये शिल्पाच्या मुलीचा म्हणजेच समिशाचा देखील एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता.
या सोबतच शिल्पाने नुकताच लोहड़ी हा सण देखील संपूर्ण परिवारासोबत साजरा केला. त्याचा देखील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या दोघींच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर शिल्पा मागील काही काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. आता लवकरच ती ‘निकम्मा’ या चित्रपटात अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दसानी आणि सिंगर शर्ले सेठीया यांच्यासोबत मुख्य भूमिका साकारणार आहे. शिवाय ती परेश रावल आणि मीजान जाफरी यांच्यासोबत ‘हंगामा २’ या सिनेमातही ती दिसणार आहे. शमिताने नुकतेच तिचे डिजिटल पदार्पण केले आहे. झी ५ च्या ‘ब्लॅक विडो’ मध्ये तिने मुख्य भूमिका साकारली असून ही वेबसिरीज खूप लोकप्रिय ठरत आहे.

हे देखील वाचा