Thursday, January 22, 2026
Home बॉलीवूड राज कुंद्राच्या अटकेनंतर प्रथमच चाहत्यांसमोर येणार शिल्पा शेट्टी; ‘या’ कारणामुळे घेणार लाईव्ह सेशन

राज कुंद्राच्या अटकेनंतर प्रथमच चाहत्यांसमोर येणार शिल्पा शेट्टी; ‘या’ कारणामुळे घेणार लाईव्ह सेशन

मागच्या महिन्यात १९ तारखेला अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा उद्योगपती राज कुंद्राला पॉर्न चित्रपटांच्या निर्मितीच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. सध्या राज न्यायालयीन कोठडीत असून, त्याच्या या आरोपांवर रोज वेगवेगळे खुलासे आणि अनेक पीडित महिला समोर येत आहे. राज कुंद्राला अटक झाल्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीसह उद्योगजगतातही मोठ्या प्रमाणावर खळबळ माजली. या अटकेनंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.

या संपूर्ण प्रकरणानंतर शिल्पा सोशल मीडिया, तिचे शो आणि सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर झाली. एवढ्या दिवसांमध्ये फक्त एकदा तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्यावर पुराव्यांशिवाय आरोप करायला मज्जाव केला. त्यानंतर पुन्हा शिल्पा गायब झाली. ती परीक्षक असणाऱ्या सुपर डान्सरमध्ये देखील दिसली नाहीये. या सर्वांमध्ये शिल्पा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर येणार असल्याच्या चर्चा कानावर येत आहेत. (shilpa shetty public appearance after husband raj kundra arrest)

प्राप्त माहितीनुसार कोविड-१९ रिलीफ फंडकरता पैसे गोळा करण्यासाठी ‘We For India: Saving Lives, Protecting Livelihoods’ हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे. या कार्यक्रमात अर्जुन कपूर, दिया मिर्झा, एड शिरीन, करण जोहर, परिणीती चोप्रा, सैफ अली खाना, सारा अली खान, स्टीव्हन स्पीलबर्ग आदी कलाकार उपस्थित राहणार आहेत. या सर्वांसोबत शिल्पा शेट्टी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याच्या चर्चा मीडिया आणि बॉलिवूडमध्ये रंगत आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या तीन तासाच्या कार्यक्रमासाठी हजेरी लावू शकते.

या कार्यक्रमातून जमवल्या जाणाऱ्या पैशांमधून ऑक्सिजन कन्सेंट्रेटर, व्हेंटिलेटर, औषधे, आयसीयू युनिट यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. . हा कार्यक्रम ३ तासांचा असणार हा कार्यक्रम फेसबूकवर लाईव्ह असेल. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजकुमार राव करणार आहे.

काही दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टी आणी राज कुंद्रा यांचा मुलगा असलेल्या विवानने देखील त्याचे शिल्पा शेट्टीसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. विवान देखील सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

अरुणिता कांजिलालसोबतच्या आपल्या नात्यावर पवनदीप राजनचा मोठा खुलासा; म्हणाला, ‘आम्ही एकमेकांच्या खूपच…’

सुपर्ब! मराठमोळ्या अनुजा साठेचा वर्कआऊट पाहून तुम्हीही व्हाल थक्क; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

‘आता तिला पाहून काळजाचा ठोका चुकणार नाही, तर कायमचा थांबणार’, ‘रात्रीस खेळ चाले ३’ चा प्रोमो प्रदर्शित

 

हे देखील वाचा