अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि सुंदर अभिनेत्री आहे. जसजसे तिचे वय वाढत चालले आहे, तसतशी ती आणखी सुंदर दिसत आहे. फिटनेस हे नाव घेतले की, सर्वांसमोर फक्त शिल्पा शेट्टी हेच नाव येते. तिची फिटनेस बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींना टक्कर देते. सध्या शिल्पा तिच्या आगामी चित्रपट ‘हंगामा २’ मुळे खूप चर्चेत आहे. खूप दिवसानंतर ती मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात ती मिजान जाफरी, परेश रावल आणि प्रणिता सुभाषसोबत दिसणार आहे. अशातच शिल्पा ‘हंगामा २’ च्या प्रमोशनसाठी बाहेर पडली होती. यावेळी ती खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत होती. (Shilpa Shetty gel troll for wearing bold dress during hangama 2 pramotion)
‘हंगामा २’ च्या प्रमोशनसाठी गेलेल्या शिल्पाने क्रॉप टॉप आणि ब्राऊन कलरचा लेदरचा स्कर्ट घातला होता. या ड्रेसमध्ये ती खूपच बोल्ड दिसत होती. तिचा हा ड्रेस काही लोकांना खूप आवडला आणि तर काहींना अजिबात आवडला नाही. काही युजर्स शिल्पा शेट्टीची तुलना किम कर्दाशियनसोबत करत आहेत. युजर कमेंट करून तिला बॉलिवूडची किम कर्दाशियन म्हणत आहेत.
एका युजरने तिच्या या व्हिडिओवर कमेंट केली आहे की, “बॉलिवूडची किम कर्दाशियन.” तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, “एवढे पैसे असून देखील लोक बिना कपड्याचे फिरतात.” तसेच काहीजण मिजान जाफरीची मजा उडवत आहेत. तर शिल्पा शेट्टीला जोरदार ट्रोल करत आहेत.
या प्रमोशनवेळी शिल्पा शेट्टी मिजान जाफरीसोबत मज्जा करताना दिसली आहे. तिचे हे वागणे काहींना आवडले नाही. त्यावरून तिला ट्रोल करत आहेत. काहीजण तर तिला घमंडी असे म्हणत आहेत.
‘हंगामा 2’ या चित्रपटात शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमार यांचा ‘मैं खिलाडी तू अनाडी’ या चित्रपटातील गाणे ‘चुरा के दिल मेरा’ हे रिमेक केले आहे. हे गाणे नुकतेच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-