बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला १९ जुलै २०२१ रोजी अश्लिल चित्रपट प्रकरणी दीर्घ चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे. राज कुंद्रा सध्या जेलमध्ये आहे आणि सतत जामीन मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे. राज कुंद्राचे हे प्रकरण समोर आल्यानंतर त्याची पत्नी शिल्पा शेट्टीच्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच व्यायसायिक आयुष्यावरही त्याचा खोलवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. या प्रकरणांनंतर शिल्पा बराच काळ ‘सुपर डान्सर’ या शोमध्ये दिसली नव्हती. माध्यमातील वृत्तानुसार, या याप्रकरणानंतर तिच्या हातून अनेक मोठे ब्रँड देखील सुटले आहे.
राज कुंद्रापासून वेगळं राहण्याचा करतेय विचार
हळू-हळू शिल्पाचे करिअर पुन्हा एकदा सुरळीतपणे ट्रॅकवर येत आहे. ती पुन्हा ‘सुपर डान्सर ४’ शोमध्ये परतली आहे. माध्यमातील वृत्तानुसार, शिल्पा शोमध्ये फक्त एका अटीवर परतली आहे की, ती कोणत्याही विवादात्मक प्रश्नाचे उत्तर देणार नाही. मात्र, आता शिल्पाबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. वृत्तानुसार, शिल्पा तिच्या दोन मुलांसह राज कुंद्रापासून विभक्त होण्याचा विचार करत आहे.
शिल्पाला बसलाय धक्का
अहवालानुसार, शिल्पाच्या मित्राने सांगितले की, राज कुंद्राच्या अडचणी कमी होण्याचं नावच घेत नाहीत. अहवालात असेही म्हटले आहे की, शिल्पाच्या मित्राने खुलासा करताना सांगितले की, राज कुंद्राचे हे रहस्य समोर आल्यापासून शिल्पा धक्क्यात आहे. अहवालात मित्राच्या नावाने खुलासा करण्यात आला आहे की, शिल्पाला हे माहित नव्हते की, तिच्यासाठी हिरे आणि डुप्लेक्स चुकीच्या कामातून विकत घेतले होते.
शिल्पा मुलांची काळजी घेण्यास स्वतंत्र्य आहे
अहवालात मित्राच्या म्हणण्यानुसार पुढे हे देखील म्हटले आहे की, शिल्पाची राज कुंद्राच्या पैशांना स्पर्श करण्याची देखील इच्छा नाही. मित्र पुढे म्हणाला की, शिल्पा आता काम करत आहे आणि तिच्या मुलांची काळजी घेण्यासाठी पुरेशी आहे. शिल्पाने इंडस्ट्रीतील प्रत्येकाला सांगितले आहे की, ‘हंगामा २’ आणि ‘निकम्मा’ नंतर ती चित्रपटांसाठी तयार आहे.
मिळतायेत चित्रपटांच्या ऑफर
शिल्पा परतल्यानंतर अनुराग बासू आणि प्रियदर्शिनीनेही त्यांच्या चित्रपटांमध्ये तिला भूमिकेसाठी विचारणा केली आहे. शिल्पा ‘हंगामा २’मध्ये प्रियदर्शिनीसोबत काम करताना दिसली होती. तिने अनुराग बासूच्या ‘लाइफ इन अ मेट्रो’ या चित्रपटात काम केले आहे आणि त्याच्यासोबत सुपर डान्सरच्या शोमधे जज करत आहे.
सोशल मीडियावर भावनिक झाली
अलीकडेच शिल्पाने सोशल मीडियावर बराच काळ पुनरागमन केले. ती पुन्हा एकदा कधीतरी योगा मोटिवेशन कोट तर, कधी काही विचार सामायिक करत असते. अलीकडेच शिल्पाने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. ज्यात ती प्रचंड भावनिक दिसली. या पोस्टमध्ये एका पुस्तकातील काही पानांचे फोटो होते. ज्यामध्ये जीवनातील चुकांबद्दल लिहिलेले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अभिनयात येण्यापूर्वी ‘हे’ काम करायची श्रुती हासन; म्हणाली, ‘कोणालाही माहित नव्हते की…’
-Bigg Boss OTT: लाजून लाल झाली शमिता, जेव्हा करणने ‘हॉटनेस’वर प्रश्न विचारताच राकेश म्हणाला…
-‘टायगर ३’साठी कॅटरिना कैफ रशियाला रवाना; स्टंट सीन शूट करण्यासाठी घेतीये प्रचंड मेहनत