शिल्पा शेट्टी बराचद्या सापडलीय वादाच्या भोवऱ्यात; अंडरवर्ल्ड कनेक्शनचा होता आरोप, तर बोल्ड फोटोशूटमुळेही होती ती चर्चेत


बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी या दिवसात डान्सिंग रियॅलिटी शो ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ मध्ये परीक्षक आहे. या शोमधील तिचा डायलॉग ‘सुपर से उपर’ हा खूप प्रसिद्ध आहे. शिल्पाने अनेक दिवसांपासून कोणत्याही चित्रपटात काम केले नाही. तरीही ती नेहमीच चर्चेत असते. शिल्पा शेट्टी ही तिच्या लग्नापासून ते बिग ब्रदर ५ ते अंडरवर्ल्ड कनेक्शन पर्यंत चर्चेत आहे. (Shilpa Shetty life controversies and under world connection that shocked bollywood)

सर्वात महत्वाचे म्हणजे शिल्पा शेट्टीने राज कुंद्रासोबत लग्न केले आहे. तिच्यावर राज कुंद्राचे वैवाहिक जीवन बर्बाद केल्याचा आरोप आहे. शिल्पा आणि राज हे दोघे जेव्हा प्रेमात पडले, तेव्हा राज कुंद्राचे लग्न झाले होते. त्याने त्याची पहिली पत्नी कविताला घटस्फोट देऊन शिल्पासोबत लग्न केले. त्या वेळी त्यांचे लग्न खूप चर्चेत होते. नुकतेच काही दिवसांपूर्वी राज कुंद्राने त्याचे पहिल्या लग्नाबाबत खुलासा केला आहे. त्याने सांगितले होते की, त्याचे पहिले लग्न तुटण्याचे कारण शिल्पा नाही, तर त्याची पहिली पत्नी कविता हीच आहे.

शिल्पाने अमेरिकन रियॅलिटी शो ‘बिग ब्रदर 5’ मध्ये भाग घेतला होता. त्यावेळी शिल्पा शेट्टीवर ब्रिटनमधील टीव्ही अभिनेत्री जेड गुडी हिने वर्णावरून टिप्पणी केली होती. तेव्हा संपूर्ण जगात हे प्रकरण खूप गाजले होते आणि शिल्पा शेट्टीला सगळ्याची सहानूभुती मिळाली होती. त्या वेळी ती खूप चर्चेत होती. तिची लोकप्रियता खूप वाढली होती. शेवटी शिल्पाच या शोची विनर झाली होती.

शिल्पा शेट्टीवर २००३ मध्ये अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचा आरोप लावला होता. यामुळे ती खूप वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. त्यावेळी तिच्या आई-वडिलांनी या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले होते. त्यांनी तिची प्रतिमा खराब करण्याचा आरोप देखील केला होता.

शिल्पाने २००६ मध्ये एका तमिळ मॅगझिनच्या कव्हर पेजसाठी बोल्ड फोटोशूट केले होते. त्यावेळी देखील ती खूप वाद विवादात अडकली होती. एवढंच नाही, तर मदूरईमधील एका कोर्टात अश्लीलता वाढवण्याच्या आरोपाखाली तिच्या विरुद्ध वॉरंट होते. परंतु कोर्टात तिने तिच्यावरचे सगळे आरोप खोडून काढले होते.

या घटनेनंतर एक वर्षाने शिल्पा शेट्टी एका एड्स जनजागृती कार्यक्रमात सामील झाली होती. तिथे हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरने सर्वांसमोर तिला किस केले होते. अचानक झालेल्या या घटनेनंतर तिला काय करावं हेच कळत नव्हतं. या नंतर ही घटना अनेक दिवस प्रेक्षकांमध्ये चर्चेत होती. अशा अनेक गोष्टीमुळे शिल्पा शेट्टी चर्चेत होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी थाटला तिने संसार; तर १७ व्या वर्षी उर्वशी ढोलकिया बनली होती दोन जुळ्या मुलांची आई

-जेव्हा विवाहित गुरू दत्त पडले होते वहिदा रहमान यांच्या प्रेमात; अजूनही उलगडलं नाही त्यांच्या मृत्यूचं रहस्य

-चित्रपटसृष्टीत येण्यासाठी संजीव कुमार यांनी लपवले खरे नाव; तर ‘या’ कारणामुळे नुतनने मारली होती त्यांच्या कालशिलात


Leave A Reply

Your email address will not be published.