जेव्हा राज कुंद्राला अश्लील चित्रपटांच्या निर्मितीसाठी अटक झाली तेव्हापासून ते आजतागायत शिल्पा आणि राज सतत प्रकाशझोतात आहे. या दोघांबद्दल आणि राजच्या व्ययसायाबद्दल रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहे. अनेक अभिनेत्री समोर येऊन याबद्दल रोज नवी माहिती देत आहे. यासर्व गोष्टींमुळे शिल्पा आणि राजचे नाव मीडियामध्ये मोठ्या प्रमाणावर गाजत आहे. शिवाय सोशल मीडियावर या दोघांना मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगला देखील सामोरे जावे लागत आहे. आता या सर्व घटनांनंतर पहिल्यांदाच शिल्पाने तिचे स्टेटमेंट जरी केले आहे. सोशल मीडियावर तिने तिचे हे स्टेटमेंट पोस्ट केले आहे.
या लांबलचक पोस्टमध्ये शिल्पाने लिहिले आहे, “हो, मागील काही दिवस प्रत्येक बाजूने आमच्यासाठी आव्हानांनी भरलेले आहे. अनेक अफवा आणि आरोप आमच्यावर करण्यात येत आहेत. सोशल मीडियावरही आम्हाला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले. माझ्यासोबत माझ्या कुटुंबाला देखील मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. माझी भुमिका हीच आहे की, मी काहीच बोलणार नाही. एक अभिनेत्री असल्यामुळे माझे हेच तत्व आहे की, कधीही तक्रार करू नका आणि स्पष्टीकरण देऊ नका. कारण ही केस अद्यापही कोर्टात आहे. माझा भारतीय न्यायव्यवस्थेवर आणि मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. “(Shilpa Shetty released her statement in Raj Kundra case)
My statement. pic.twitter.com/AAHb2STNNh
— SHILPA SHETTY KUNDRA (@TheShilpaShetty) August 2, 2021
पुढे शिल्पा या केसबद्दल कशा भूमिकेत असेल हे सांगताना तिने लिहिले, “मी या प्रकरणात पुढेही शांतच राहणार आहे. तर माझ्या नावावर खोट्या बातम्या बनवू नका. कोणत्याही अर्धवट माहितीवर कमेंट्स करू नका. मी कायदा पाळणारी भारतीय आणि मागील २९ वर्षांपासून काम करणारी प्रोफेशनल स्त्री आहे. लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी कधीही कोणाचा विश्वास तोडला नाही. मी तुम्हाला आवाहन करते की, माझ्या कुटुंबाची आणि माझ्या खासगी आयुष्याचा सन्मान करा. या वेळेला आम्हाला एकटे सोडा, आम्हाला मीडिया ट्रायलची गरज नाही. कृपा करून कायद्याला त्यांचे काम करू द्या. सत्यमेव जयते.”
दरम्यान १९ जुलैला राज कुंद्राला अश्लील चित्रपटांच्या निर्मितीसाठी मुंबई पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. यासर्व प्रकरणावर शिल्पा आणि तिचे संपूर्ण कुटुंब मोठ्या प्रमाणावर ट्रोल होत असल्याने, शिल्पाने आज तिचे स्टेटमेंट जारी केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-काय सांगता! चक्क बर्फाच्या पाण्यात केला त्यांनी रोमँटिक डान्स; बघतच राहिले प्रेक्षक