कसे आले शिल्पा अन् राज एकमेकांच्या जवळ? जाणून घ्या जोडप्याची रंजक लव्हस्टोरी


मनोरंजन विश्वातील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध असणारी चर्चेतील जोडी म्हणजे राज कुंद्रा आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी. अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि बिझनेसमन राज कुंद्रा यांना बॉलिवूडमधील लोकप्रिय बेस्ट जोडी देखील म्हटली जाते. राज कुंद्रा आणि शिल्पा सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असतात. या दोघांचे फनी व्हिडिओ नेहमी व्हायरल होत असतात. या दोघांच्या लग्नाला १० पेक्षा अधिक वर्ष झाले आहे. आज आम्ही तुम्हाला या दोघांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगणार आहोत.

राज कुंद्रा हा शिल्पा शेट्टीसोबत लग्नाकरण्याआधीच विवाहित होता. शिल्पासोबत त्याचे दुसरे लग्न आहे. राज आणि शिल्पा यांची भेट २००७ च्या दरम्यान लंडनमध्ये झाली. शिल्पाने १९९३ साली ‘बाजीगर’ सिनेमातून अभिनयात पदार्पण केले. त्यानंतर ती सलमान, अक्षय, सैफ अशा मोठ्या अभिनेत्यांसोबत झळकली. मात्र, २०००दशकातल्या काही वर्षांमध्ये शिल्पाचे सिनेमे फ्लॉप होऊ लागले. त्यातच तिला परदेशी टीव्हीवरील सर्वात विवादित शो असणाऱ्या ‘बिग ब्रदर’मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आणि शिल्पाने ती स्वीकारली. नशिबाने आणि तिच्या मेहनतीने तिने हा शो जिंकला आणि शिल्पाचे स्टारडम अधिकच वाढले. या शोनंतर शिल्पा लंडनमध्ये तिच्या परफ्युम ब्रॅण्डला प्रमोट करण्यासाठी गेली होती.

या परफ्यूमच्या प्रमोशनमध्ये तिला राज कुंद्रा मदत करत होता. यावेळी त्यांची पहिल्यांदा भेट झाली. त्यानंतर ते सतत भेटत होते. हळहळू त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. राज आणि शिल्पाने एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. डेटिंगच्या काही महिन्यांनी म्हणजेच २२ नोव्हेंबर, २००९ ला या दोघांनी खंडाळा येथे एका फार्म हाऊसवर पंजाबी पद्धतीने लग्न केले. या दोघांचे लग्न इतके भव्य आणि शानदार झाले की, आजही बॉलिवूडमधील मोठ्या लग्नांमध्ये यांच्या लग्नाचा समावेश होतो.

असे म्हटले जाते की, शिल्पासाठी राजने त्याच्या पहिल्या बायकोला कविताला घटस्फोट दिला. शिल्पावर देखील ‘होमब्रेकर’चा ठपका लावला गेला. राजच्या पहिल्या पत्नीने कविताने एका मुलाखतीत शिल्पाबद्दल बोलताना तिला ‘शिल्पामुळे त्यांचे घर तुटल्याचे’ म्हणत तिने शिल्पाला ‘होम ब्रेकर’ म्हटले होते.

यावर शिल्पाने सांगितले होते की, “ती जेव्हा राजच्या संपर्कात आली, तेव्हा राज आणि कविताचा घटफोट झाला होता. त्याआधी मी राज कुंद्राला ओळखत देखील नव्हते. त्याच्या घटस्फोटाच्या काही महिन्यानंतर आमची भेट झाली होती.”

राज ते एकमेकांना डेट करत असल्यापासूनच शिल्पाला अनेक महागड्या भेटवस्तू देत होता. लग्नानंतरही त्याने शिल्पाला हिऱ्याच्या अंगठीपासून ते दुबईतील बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट, लंडनमधील आलिशान बंगला, महागड्या गाड्यांपर्यंत अनेक भेटवस्तू दिल्या आहेत.

नुकतेच राज कुंद्राला अश्लील चित्रपट निर्मितीच्या उद्योगामुळे अटक करण्यात आली आणि सर्वत्र एकच खळबळ माजली. इतकेच नाही, तर राजने या अश्लील सिनेमे बनवण्याच्या उद्योगात सुमारे ८ ते १० कोटींची गुंतवणूक केली आहे. एक मोठा आणि प्रतिष्ठित उद्योजक असणाऱ्या राजला या गोष्टीमुळे अटक व्हावी, ही खरंच खूपच वाईट आणि खाली मान घालणारी घटना आहे. मुख्य म्हणजे या प्रकारामुळे आता अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे देखील नाव खराब झाले आहे. राजच्या प्रत्येक उद्योगात भागीदार असणाऱ्या शिल्पाला देखील चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट’ म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या आदित्यला सीआयडीच्या ‘अभिजीत’ने मिळवून दिली घराघरात ओळख

-रात्री उशिरापर्यंत शूटिंग करताना ‘बिग बीं’ची ‘अशी’ झाली अवस्था; म्हणाले, ‘असंच होतं, जेव्हा…’

-पिवळ्या रंगाच्या ब्लेझर सूटमध्ये श्रुती मराठे दिसतेय खूपच आकर्षक, पाहून चुकेल तुमच्याही हृदयाच्या ठोका


Leave A Reply

Your email address will not be published.