बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरून गायब झाली होती. इंस्टाग्रामवर तिने सांगितले होते की, आता ती सोशल मीडियाला अलविदा करत आहे. ती म्हणाली की, ती मोनोटोनीला कंटाळली आहे. तिला तिथे सर्व तसेच दिसते. यामुळे ती या प्लॅटफॉर्मपासून दूर जात आहे. जोपर्यंत तिला नवा अवतार मिळत नाही, तोपर्यंत ती परत येणार नाही. १२ मे रोजी या पोस्टनंतर, ती आता १६ मे रोजी इंस्टाग्रामवर परतली आहे, तेही एका नवीन अवतारात.
खरं तर शिल्पा शेट्टीने तिच्या आगामी ‘निकम्मा’ या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. हे त्याचे मोशन पोस्टर आहे. यामध्ये शिल्पा एका सुपरवुमनच्या गेटअपमध्ये दिसत आहे. तिच्या म्हणण्यानुसार, चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजेच १७ मे रोजी रिलीझ होणार आहेय चित्रपटात तिच्या पात्राचे नाव अवनी आहे, जे तिच्या आधीच्या सर्व पात्रांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. शिल्पा आता चित्रपटात रोमान्स नव्हे तर ऍक्शन करताना दिसणार आहे. (shilpa shetty return to social media with new superwoman look of upcoming film nikamma)
सब्बीर खान दिग्दर्शित या चित्रपटातून शिल्पा १४ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर परतणार आहे. ती ‘हंगामा २’मध्ये तर दिसली होती, पण तो OTT वर प्रदर्शित झाला होता आणि हा चित्रपट १७ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटात शिल्पा शेट्टी व्यतिरिक्त अभिमन्यू दासानी आणि शर्ली सेटिया देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
रोहित शेट्टीसोबत करतेय शूटिंग
शिल्पा शेट्टी सध्या गोव्यात रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलिस फोर्स’ या वेब सीरिजचे शूटिंग करत आहे. अभिनेत्री दिग्दर्शकाच्या पोलीस विश्वातील पहिली महिला पोलीस आहे. जेव्हा तिचा फर्स्ट लूक समोर आला, तेव्हा त्यालाही चाहत्यांची चांगलीच पसंती मिळाली. या शोमधून रोहित ओटीटीवर पदार्पण करणार आहे. यामध्ये अभिनेत्रीसोबत सिद्धार्थ मल्होत्रा आणि विवेक ओबेरॉय देखील दिसणार आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा









