Wednesday, July 3, 2024

शिल्पा शेट्टीच्या कमबॅकचं कष्ट पाण्यात! ‘हंगामा २’ चित्रपट रिलीझ झाला पण…

साल २००३ मध्ये प्रदर्शित झालेला  ‘हंगामा’ चित्रपट प्रचंड गाजला होता. आज (२ ऑगस्ट) या चित्रपटाचा सिक्वेल ‘हंगामा २’ रिलीज झाला आहे. हे दोन्ही चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या दिग्दर्शनाखाली बनवण्यात आले आहेत. जुन्या ‘हंगामा’ चित्रपटापेक्षा हंगामा २’ या चित्रपटामध्ये जास्त हंगामा अपेक्षित होता.  मात्र, त्यामध्ये काहीच हंगामा नसल्याने, चित्रपट सपाटतेने पुढे जात आहे. या ‘हंगामा २’मध्ये काहीच मनोरंजन नाही किंवा कथेमध्ये देखील कसलीच गुणवत्ता नाही.

या चित्रपटाची कथा मीझान जाफरीचे वडील आशुतोष राणा यांच्यापासून सुरू होते. ते त्याच्यावर खूप नाराज असतात. ते आपल्या मुलाचे घर तुटत असल्याचे पाहत आहेत. मात्र, त्यांचा मुलगा मीझान याला काही फरक पडत नसतो. चित्रपट सुरुवातीपासूनच कंटाळवाणा आहे. त्यामध्ये फक्त मोठमोठी घरे दिसत आहेत. ही मोठ्या लोकांची कथा आहे, ज्यांच्याकडे पैसा आहे मात्र, त्यांना आनंददायी जीवन नाही.

‘हंगामा’शी स्पर्धा करू शकला नाही ‘हंगामा २’
प्रियदर्शन यांच्या पहिल्या ‘हंगामा’समोर त्याचा ‘हंगामा २’ चित्रपट स्पर्धा करू शकला नाही. चित्रपटात वापरलेली मोठी पात्र अधिक चांगल्या प्रकारे वापरता आली असती. जो या चित्रपटाचा सर्वात महत्वाचा चेहरा आहे, जिला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहायचे ठरवले, त्या शिल्पा शेट्टीची एंट्री चित्रपट सुरू झाल्यानंतर ४५ मिनिटांनी होते. चित्रपटातील शिल्पाचे सीन अत्यंत मर्यादित ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम प्रेक्षकांवर झाला आहे.

कथेत नाही रंजकता
प्रियदर्शनच्या चित्रपटांमध्ये स्टार कोणीही असो, प्रेक्षक कथा एन्जॉय करतात. मात्र, या चित्रपटातील कथेमध्ये रंजकता नव्हती. या चित्रपटाने प्रेक्षकांना खूप निराशा झाली आहे. चित्रपटात अंजलीची भूमिका साकारणाऱ्या शिल्पा शेट्टीचा चित्रपटात चांगला वापर करण्यात आलेला नाही. ज्यामुळे तिचे चाहतेही निराश झाले आहेत.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काय सांगता! चक्क बर्फाच्या पाण्यात केला त्यांनी रोमँटिक डान्स; बघतच राहिले प्रेक्षक

-बक्कळ रक्कमेच्या मोहात न पडता ‘या’ कलाकारांनी ‘बिग बॉस’साठी दिला स्पष्ट नकार; सलमानच्या अभिनेत्रीचाही आहे समावेश

-सोनू सूदच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! अभिनेता बनला ऑलिम्पिक मूवमेंटचा ब्रँड ऍंम्बेसेडर; रशियात करणार टीम इंडियाचे नेतृत्व

हे देखील वाचा