सामान्य मुलीपासून लोकप्रिय चेहरा बनली शर्ली सेतिया; केवळ गायकीचेच नव्हे, तर तिच्या लुक्सचेही आहेत लाखो दिवाने


सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या सोशल मीडियामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात असलेली प्रतिभा लोकांपर्यंत पोहचण्यास मदत झाली आहे. सोशल मीडियामुळे अनेक चांगले कलाकार पुढे आले आहेत आणि त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला असून, ते त्यांची प्रतिभा लोकांपर्यंत पोहचवण्यासोबतच एक स्टार सेलिब्रिटी झाले आहेत. आजच्या काळात सोशल मीडियावर लोकप्रिय असणाऱ्या आणि सोशल मीडिया सेन्सेशन असणाऱ्या कलाकारांचे सुगीचे दिवस आले आहेत. अशा कलाकारांना मोठमोठे ब्रेक मिळताना आपण पाहिले आहे. अशीच यूट्यूबवरील एक कलाकार म्हणजे शर्ली सेतिया. आज शर्ली तिचा २६ वा वाढदिवस साजरा करत आहे. २ जुलै १९९५ ला दमनमध्ये शर्लीचा जन्म झाला. जाणून घेऊया तिच्याबद्दल अधिक माहिती.

एका रात्रीत अनेक सोशल मीडियावरील लोकांचे आयुष्य बदलताना आपण पाहिले आहे, ऐकले आहे. यातलीच एक म्हणजे शर्ली सेतिया. शर्लीने तिच्या लुक्सने, गाण्यांनी आणि आवाजाने अनेकांना वेड लावले आहे. शर्ली ही एक यूट्यूबर असून, ती तिच्या यूट्यूबवरील गाण्यांसाठी तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. शर्ली नेहमी अनेक गाण्यांचे कार्यक्रम यूट्यूबवर लाईव्ह करत असते.

शर्लीच्या जन्मानंतर शर्लीचे आई वडील न्यूझीलंडमध्ये गेले आणि न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये तिचे शिक्षण झाले. ऑकलंड विद्यापीठातून तिने पदवी घेतली. शर्ली इंडो-किवी गायिका म्हणून ओळखली जाते. शर्लीचे हिंदी गाणे देखील तुफान हिट झाले. ‘सनम रे’ हे गाणे देखील यातलेच एक आहे.

बबली गर्ल शर्ली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहे. ती तिच्या क्युटनेसमुळे ओळखली जाते. एक गायिका असण्यासोबतच ती उत्तम अभिनेत्री देखील आहे. शर्लीचे प्रत्येक गाणे यूट्यूबवर ट्रेंडिंगमध्ये टॉपवर जाते.

एका मुलाखतीदरम्यान शर्लीने सांगितले होते की, “१६ वर्षाची असताना मी यूट्यूबवर एक गाणे स्वतःच्या आवाजात गाऊन अपलोड केले. त्यांनतर माझ्या डोक्यात आले की, आपणच गाणे तयार करून यूट्यूबवर टाकायचे. यानंतर माझा प्रवास चालू झाला. ‘तुम ही हो… अब तुम ही हो’ हे माझे पहिले हिट झालेले गाणे आहे.”

तत्पूर्वी शर्लीने मागच्या वर्षी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘मस्का’ या सिनेमातून तिच्या अभिनय करियरला सुरुवात केली. लवकरच ती आता अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यु दासानसोबत ‘निकम्मा’ सिनेमात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘केजीएफ’ स्टार यशने खरेदी केले कोटींचे आलिशान घर; पत्नी राधिकासोबत पूजा करताना दिसला अभिनेता

जेव्हा वडिलांसोबत चित्रपट बघताना अचानक इंटीमेट सीन यायचा, तेव्हा…; तापसीने सांगितला ‘तो’ किस्सा

-महिमा चौधरी ट्रोलर्सच्या निशाण्यावर; मंदिरा बेदीच्या पतीच्या मृत्यूवर ‘अशाप्रकारे’ दुःख व्यक्त केल्याने नेटकरी झाले नाराज


Leave A Reply

Your email address will not be published.