Monday, June 24, 2024

फ्लाइटमध्ये शिव ठाकरेंवर फिदा झाली एअर हाेस्टेस; बिग बाॅस स्टारला खास गिफ्ट देत म्हणाली, ‘आई शपथ…’

बिग बॉस 16‘चा स्पर्धक शिव ठाकरे पराभूत होऊनही लोकांच्या मनावर राज्य करत आहे. तो या शोमध्ये दुसरा रनर अप झाला असेल, पण चाहत्यांसाठी तो खरा विजेता आहे. बिग बॉसनंतर शिवाच्या फॅन फॉलोइंगमध्ये सातत्याने वाढ होत आहे, विशेषत: महिला फॅन फॉलोइंगमध्ये. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी अनेक मुलींनी सोशल मीडियावर त्याला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली हाेती. अशात आता एक एअर होस्टेस शिव ठाकरेंच्या प्रेमात पडली असून तिने बिग बॉस स्टारला एक खास भेटही दिली आहे. ही बातमी समोर आल्यानंतर शिवा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

अलीकडेच शिव ठाकरे (shiv thakare) मुंबईला विमानाने गेला. जिथे त्याला एक एअर होस्टेस म्हणून फॅन मिळाली. शिवला समोर पाहून एअर होस्टेस इतकी खुश झाली की तिने तिच्या स्टारसाठी खास चिठ्ठी लिहिली. शिवला मिळालेल्या या चिठ्ठीत चाहतीने त्याच्यासाठी एक प्रेमळ संदेश लिहिला आहे.

चाहती म्हणाला, “मी तुझी प्रशंसा करते, मी तुझा आदर करते, मला तुला भेटून आनंद झाला आहे आणि तुला पुन्हा भेटण्यासाठी एक्साइटेड आहे. आई शपथ खूप सारे प्रेम! आणि हो, मी आणि माझी आई तुझे खुप माेठे चाहते आहोत. तुझ्यावर प्रेम करते.”

बिग बॉस 16 मधून बाहेर आल्यानंतर शिव ठाकरे त्यांच्या घरी गेला, जिथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. शिवने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये शिवच्या चाहत्यांनी ढोल-ताशांच्या गजरात त्याचे त्याच्या गावी जल्लोषात स्वागत केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

शिव ठाकरे यांनी ‘बिग बॉस 16’ च्या संपूर्ण सीझनमध्ये चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले. मात्र, अंतिम फेरी गाठूनही तो विजयापासून वंचित राहिला. एमसी स्टॅन विजेता ठरला तर शिव ठाकरे उपविजेता ठरला.( shiv thakare gets hand written note from air hostess on mumbai flight)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘अनारकली डिस्काे चली’, अर्चना गाैतमचा लेटेस्ट फाेटाेशूट एकदा पाहाच

‘बिग बॉस 16’ फेम अर्चना गौतम एकेकाळी करायची सिलेंडर पोहचवण्याचे काम

हे देखील वाचा